सीएसकेच्या 14 करोड खेळाडूचा धडाका! आयपीएल 2026 पूर्वी इतर संघांना दिला मोठा इशारा
विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hajare trophy 2025- 26) 2025-26 ला सुरुवात झाली आहे. 24 डिसेंबर रोजी झालेल्या पहिल्याच दिवशी फलंदाज आणि गोलंदाजांचा जलवा पाहायला मिळाला. राजकोटमध्ये उत्तर प्रदेश आणि हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात प्रशांत वीरने (Prashant veer) आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
आयपीएलच्या लिलावात चेन्नई सुपर किंग्सने (CSK) प्रशांत वीरला 14.20 कोटी रुपयांची मोठी बोली लावून आपल्या संघात घेतले होते. आता त्याने आपल्या किमतीला साजेसा खेळ करून दाखवला आहे. उत्तर प्रदेशकडून खेळताना हैदराबादविरुद्ध त्याने 10 षटकांत 47 धावा देऊन 3 महत्त्वाचे विकेट्स घेतल्या. आयपीएल 2026 सुरू होण्यापूर्वीच त्याने आपण फॉर्मात असल्याचा पुरावा दिला आहे.
प्रथम फलंदाजी करताना उत्तर प्रदेशने 50 षटकांत 5 बाद 324 धावांचा डोंगर उभा केला होता. यात प्रामुख्याने या खेळाडूंनी योगदान दिले. अभिषेक गोस्वामने 81 चेंडूत 81 धावा केल्या. आर्यन जुयाल 80, ध्रुव जुरेल 80, रिंकू सिंगने 67 धावा केल्या.
325 धावांचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ 43 षटकांत 240 धावांतच गारद झाला. तनमय अग्रवालने 53 आणि राहुल बुद्धीने 47 धावा केल्या, पण इतर फलंदाज मोठी खेळी करू शकले नाहीत. प्रशांत वीरने मोक्याच्या क्षणी विकेट्स घेतल्यामुळे हैदराबादला सावरण्याची संधी मिळाली नाही. उत्तर प्रदेशने हा सामना 84 धावांनी जिंकला.
Comments are closed.