पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा मोठा बदल; सरफराजला डच्चू, आयुष म्हात्रेला संधी? पाहा संभाव्य संघ

आयपीएलच्या (IPL 2026) नवीन हंगामाचा थरार 28 मार्चपासून सुरू होत आहे. पाच वेळा जेतेपद पटकावणारा चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघ आपल्या मोहिमेची सुरुवात 30 मार्च रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. चेन्नईसाठी हा हंगाम अत्यंत खास मानला जात आहे, कारण नुकत्याच झालेल्या मिनी ऑक्शनमध्ये संघाने युवा खेळाडूंची मोठी फौज तयार केली आहे. संघाने यंदा अनुभवी खेळाडूंपेक्षा टॅलेंटेड युवा खेळाडूंवर मोठी बोली लावून गुंतवणूक केली आहे, त्यामुळे या खेळाडूंकडून संघाला आणि चाहत्यांना मोठ्या अपेक्षा असतील.
च्या
राजस्थानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात चेन्नईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सरफराज खानला (Sarfaraz Khan) संधी मिळणे कठीण दिसत आहे. संघाची रणनीती पाहता त्याला कदाचित बाकावर बसावे लागू शकते. दुसरीकडे, ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) हा यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संघाचा मुख्य कणा असेल. डावाची सुरुवात करण्याची (Openers) जबाबदारी युवा आयुष म्हात्रे (Ayush mhatre & Sanju Samson) आणि संजू सॅमसन यांच्या खांद्यावर असेल. या नवीन जोडीच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
च्या
चेन्नईच्या गोलंदाजी विभागात मात्र काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. वेगवान गोलंदाज नॅथन एलिस दुखापतीमुळे बाहेर झाला असून, ही संघासाठी एक मोठी समस्या ठरत आहे. एलिसच्या अनुपस्थितीत चेन्नईच्या वेगवान माऱ्याची धार कमी होऊ शकते. मात्र, फिरकी विभागात अफगाणिस्तानचा नूर अहमद (Noor Ahmed) हा एक हुकमी एक्का चेन्नईकडे उपलब्ध आहे. आपल्या फिरकीच्या जाळ्याने तो प्रतिस्पर्धी फलंदाजांना रोखण्यास सज्ज आहे.
Comments are closed.