रोहित शर्माने रचला नवा इतिहास! ख्रिस गेलचा विक्रम मोडून गाठले नवे शिखर
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात खेळल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. दुबईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात हिटमॅन रोहित शर्माने षटकार मारताच तो ख्रिस गेलच्या पुढे गेला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 265 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी टीम इंडिया मैदानात आली तेव्हा रोहित शर्माने हा विक्रम केला. (Rohit Sharma Sixes Record)
रोहित शर्मा आता आयसीसी एकदिवसीय स्पर्धांमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे. आतापर्यंत हे स्थान वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने व्यापले होते, परंतु रोहितने त्याला मागे टाकले आहे. आयसीसी एकदिवसीय स्पर्धांचा विचार केला तर त्यात एकदिवसीय विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचा समावेश आहे. कारण दोन्ही स्पर्धा 50 षटकांच्या आहेत. रोहित शर्माने आता आयसीसी एकदिवसीय स्पर्धांमध्ये 65 षटकार मारले आहेत. तर ख्रिस गेल 64 षटकारांसह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. (Rohit Sharma record in ICC tournament)
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 264 धावा केल्या. संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ 50 षटके न खेळताच बाद झाला. यानंतर, टीम इंडियाचे सलामीचे फलंदाज क्रीजवर आले तेव्हा रोहित शर्माने जबाबदारी घेतली. पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने चौकार मारला, तर नॅथन एलिसच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने एक मोठा षटकारही मारला. यासह त्याने ख्रिस गेलचा विक्रम मोडला. (Champions Trophy 2025 semifinal)
पहिल्या डावात खेळताना ऑस्ट्रेलियन संघाकडून कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि अॅलेक्स कॅरी वगळता इतर कोणताही फलंदाज सातत्यपूर्ण खेळू शकला नाही. स्टीव्ह स्मिथने 96 चेंडूत 73 धावा केल्या, तर अॅलेक्स कॅरीनेही 57 चेंडूत 61 धावा केल्या. इतर कोणताही फलंदाज 50 धावांचा टप्पा ओलांडू शकला नाही. ज्याचे भारतीय संघाची तगडी गोलंदाजी होती. ज्यात मोहम्मद शमीने 10 षटकांत 48 धावा देत तीन बळी घेतले, तर वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
हेही वाचा-
ट्रेविस हेडच्या विकेटवर गोंधळ, अंपायरने शुबमन गिलला काय दिली ताकिद?
IND vs AUS: सेमीफायनलमध्ये मोहम्मद शमीचा भीमपराक्रम , 3 विकेट्स घेत अक्रम-हरभजनला मागे टाकले!
भारताची धावांचा पाठलाग करताना धोकादायक आकडेवारी, आयसीसी वनडेमध्ये मोठी चिंता!
Comments are closed.