लेह मध्ये आणखी आरामशीर कर्फ्यू
महाविद्यालये झाली सुरू : रात्री 8 पर्यंत खुली राहणार दुकाने
वृत्तसंस्था/ लेह
लेहमधील हिंसेनंतर आता जिल्ह्यातील स्थितीत सातत्याने सुधारणा होत आहे. प्रशासनाने संचारबंदी आणखी शिथिल करत बाजारपेठ खुली ठेवण्याची वेळ वाढविली आहे. बुधवारपासून लेहमध्ये महाविद्यालये पुन्हा सुरू झाली आहेत. दुकाने आणि व्यावसायिक संस्था सुरू ठेवण्याचा वेळ वाढविण्यात आला आहे. आता ही दुकाने सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत खुली ठेवता येणार आहेत. तर पूर्वी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवण्याची अनुमती देण्यात आली होती. अनेक दिवसांपासून स्थिती शांततापूर्ण आणि नियंत्रणात असल्याने निर्बंध हळूहळू शिथिल केले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
लेह जिल्ह्यातील शाळा यापूर्वीच सुरू करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक परिवहन सेवा नियमित स्वरुपात सुरू झाल्याने शहरात आणि आसपास ये-जा करणे सुलभ ठरले आहे. परंतु इंटरनेट सेवा अद्याप निलंबित आहे. यासंबंधी अधिकाऱ्यांनी सुरक्षा आणि देखरेख संबंधी चिंतांचा दाखला दिला आहे.
स्थितीचे आकलन करणे आणि जनजीवन सुरळीत होण्यासह शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी उपराज्यपाल दररोज समीक्षा बैठका घेत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. निर्बंध शिथिल झाल्याने सर्वसामान्य लोकांसोबत व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. दैनंदिन घडामोडी सुरू झाल्याने स्थिती लवकरच पूर्णपणे सामान्य होईल आणि निर्बंध पूर्णपणे हटविले जातील अशी अपेक्षा लेहच्या रहिवाशांना आहे. बीएनएसएस अधिनियमचे कलम 163 अद्याप लेहमध्sय लागू आहे. याचदरम्यान कारगिलमध्ये स्थिती सामान्य आहे. सर्व सरकारी कार्यालये, शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक परिवहन सेवा कुठल्याही अडथळ्याशिवाय सुरू आहे.
Comments are closed.