Mumbai News – मुंबई विमानतळावर 1.14 कोटीचा गांजा जप्त, बँकॉकहून आलेल्या मुंबईकर तरुणाला अटक

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 1.14 कोटी रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला असून याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. अटक केलेला आरोपी तरुण मुंबईतील अंधेरी येथील रहिवासी आहे. अरफत शेख असे अटक आरोपीचे नाव आहे. सीमाशुल्क विभागाने ही कारवाई केली.

गुप्त माहितीच्या आधारे सीमाशुल्क विभागाने सोमवारी पहाटे बँकॉकहून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अरफत शेख याला पकडले. आरोपीच्या ट्रॉली बॅगची तपासणी केली असता त्यात काही कपडे, 2 शॅम्पूच्या बाटल्या, 2 कंटेनर आणि काही चॉकलेटचे पॅकेट आढळले. स्नॅक्स कंटेनर आणि शॅम्पूच्या बाटल्या उघडल्यावर कस्टम अधिकाऱ्यांना 1.14 कोटी रुपयांचे 1144 ग्रॅम वजनाचा गांजा असलेले 28 पॅकेट आढळले.

सीमाशुल्क विभागाने एनडीपीएस कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून या रॅकेटमध्ये आणखी किता जणांचा सहभाग आहे याचा तपास सुरू आहे.

Comments are closed.