सोने तस्करी करणाऱ्या चौघांना अटक

सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) सोने तस्करी प्रकरणी दोन कारवाई करून चौघांना अटक केली. त्यात तीन खासगी विमानतळ कर्मचाऱयांचा समावेश आहे. प्रदीप पवार, मोहम्मद नागोरी, अंशू गुप्ता, सय्यद मेहताब अशी त्यांची नावे आहेत. एआययूने जप्त केलेल्या सोन्याच्या पावडरची किंमत सुमारे 3 कोटी 36 लाख रुपये इतकी आहे. त्या चौघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.
आज पहाटे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एआययूचे पथक गस्त करत होते. तेव्हा एआययूच्या अधिकाऱ्याने प्रदीपला ताब्यात घेतले. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याला तपासणीसाठी नेले. त्याच्याकडे सोन्याची पावडर मिळून आली. त्याने ती पावडर पॅण्टमध्ये लपवली होती. त्याला ते सोन्याची पावडर असलेले दोन पाऊच अज्ञात प्रवाशाने दिले होते.
Comments are closed.