जपान एअरलाईन्सवर सायबर अटॅक, तिकीटांची विक्री थांबवली

जपान एअरलाईन्सला गुरुवारी सकाळी सायबर अटॅकचा सामना करावा लागला. ज्यामुळे त्यांच्या इंटरनल आणि आऊटर दोन्ही सेवांवर परिणाम झाला. जपान एअरलाइन्सने स्थानिक वेळेनुसार सकाळी 7.24वाजता सायबर अटॅक झाल्याची पुष्टी केली.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबत माहिती देताना जपान एअरलाईन्सने लिहीले आहे की, आज सकाळी 7 वाजून 24 मिनीटांनी आमच्या इंटरनल आणि आउटल सेवांवर सायबर अटॅक केला आहे. याचा परिणाम आमच्या आऊटर सेवेवर झाला आहे. या सायबर अटॅकमुळे डोमेस्टीक आणि आंतरराष्ट्रीय विमानांवर त्याचा परिणाम झाला आहे. सायबर अटॅकमुळे खबरदारी म्हणून तिकिटांची विक्री थांबविण्यात आली आहे.

एअरलाईन्सने सायबर अटॅक झाल्याची पुष्टी केलेली आहे. तर एअरलाइन्सचे प्रवक्ता एएफपीला दिलेल्या माहितीनुसार, या अटॅकमुळे विमानांना होणाऱ्या उशीराबाबत कुठलीही माहिती अपडेट केलेली नाही. विशेष म्हणजे जपान एअरलाईन्स ही देशातील दुसरी सर्वात मोठी एअरलाईन्स आहे. जपानची सर्वात मोठी एअरलाईन ऑल निप्पॉन एअरवेज आहे.

Comments are closed.