सायबर गुन्हेगारांनी मारला कोट्यवधींचा डल्ला, चंद्रपूर जिल्हा बँकेतून 3 कोटी 70 लाख लांबवले

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील 3 कोटी 70 लाख रुपयांवर सायबर गुन्हेगारांनी डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. 7 आणि 10 फेब्रुवारी दरम्यान झालेले अनेक ट्रान्झॅक्शन सायबर गुन्हेगारांनी दिल्ली आणि नोएडा येथील खात्यांवर वळते करत हा मारला डल्ला. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतून RTGS केलेली रक्कम नागपूर येथील येस बँकेच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीच्या खात्यात जमा होते. 7 आणि 10 फेब्रुवारी या दोन दिवसात 34 खातेदारांच्या खात्यामधून ही रक्कम RTGS करण्यात आली. या प्रकरणात जिल्हा मध्यवर्ती बँक आहे “मेकर आणि चेकर”, तर बेनिफिशरी बँक आहे येस बँक. मात्र आरटीजीएस केलेली रक्कम संबंधित खात्यांमध्ये जमा न झाल्याने संशय या व्यवहाराचा संशय आला. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा बँकेने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चंद्रपूर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केलाय. बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांनी घटनेची चौकशी करण्यासाठी तज्ञांचे एक पथक बोलावल्याचे सांगितले.

Comments are closed.