सहाय्यक प्रशिक्षक, मार्करसाठी दादा खानोलकर टेनिस स्पर्धा; शिवाजी पार्क जिमखान्याकडून आयोजन
शिवाजी पार्क जिमखानाच्या वतीने 7 व 8 मार्च रोजी दुहेरी टेनिस स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जिमखान्याचा टेनिस विभागासाठी अनेक वर्षे उल्लेखनीय योगदान देणाऱया चिटणीस प्रभाकर ऊर्फ दादा खानोलकर यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा खास टेनिसपटूंना लहान वयात खेळाचे धडे देणारे सहाय्यक प्रशिक्षक आणि मार्कर यांच्यासाठी आयोजित करण्यात आली आहे.
या दहाव्या स्पर्धेत देशातील विविध टेनिस संघांचे सहाय्यक प्रशिक्षक आणि मार्कर सहभागी होत असतात. या स्पर्धेतील विजेत्यासाठी आकर्षक चषक आणि रोख रकमेच्या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. राज्य लॉन टेनिस संघटनेची मान्यता असणाऱया या स्पर्धेसाठी एकूण एक लाख 19 हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार असून अंतिम विजेत्याला 30 हजारांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. इच्छुकांनी प्रवेशासाठी शिवाजी पार्क जिमखाना दूरध्वनी क्रमांक 24443799 किंवा संजय पटेल 9820241351 यांच्याकडे 2 मार्चपर्यंत आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन प्रमुख कार्यवाह संजीव खानोलकर यांनी केले आहे.
हार्डकोर्टवरील 21 व्या किताबासह त्याने सक्रिय खेळाडूंमध्ये अव्वल खेळाडूंच्या यादीत आपले स्थान अधिक भक्कम केले. आता त्याची नजर पुढील स्पर्धांवर विशेषतः इंडियाना वेल्समधील मास्टर्स स्पर्धेवर आहे. दुबईतल्या या सहज विजयाने मेदवेदेव पुन्हा एकदा टॉप दहाच्या दिशेने जोरदार पावले टाकताना दिसत आहे.
Comments are closed.