दादरमध्ये पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दादरच्या चितळे पथ येथील पोर्तुगीज चर्चजवळ रस्त्याचे काम चालू असताना पाण्याची 9 इंच व्यासाची पाईपलाईन आज संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास फुटली. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. याबाबत माहिती मिळताच माजी शाखाप्रमुख चंद्रकांत झगडे, गटप्रमुख केदार मुळगावकर, शिवसैनिक समीर म्हात्रे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला याची माहिती दिली. अखेर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कामगारांनी अथक प्रयन्त करून दुरुस्तीचे काम पूर्ण केले. उद्या पाणीपुरवठा नियमित वेळापत्रकानुसार पूर्ववत केला जाणार असल्याची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱयांनी दिली.

Comments are closed.