दहिसार टोलांका आता 1 वर्षे

मीरा-भाईंदरच्या वेशीवर असलेल्या दहिसर टोलनाक्यामुळे प्रचंड वाहतूककोडी होते. त्यामुळे दहिसर टोलनाका आता दोन किलोमीटर पुढे आता वर्सोवा पुलासमोरील नर्सरीजवळ स्थलांतरित करण्याचा निर्णय आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. टोलनाका हलविण्याचे काम दिवाळीपूर्वी केले जाईल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ याबाबतचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठवेल. तो प्रस्ताव केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडून मंजूर झाल्यानंतर टोलनाका स्थलांतरित केला जाईल.
Comments are closed.