पीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन एटीपी चॅलेंजर 100 पुरुष टेनिस स्पर्धेत चेक प्रजासत्ताकच्या दलिबोर सेव्हर्सिना याला विजेतेपद
पुणे, 23 फेब्रुवारी 2025: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) यांच्या वतीने व क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र सरकार, पीएमसी, पीसीएमसी आणि पीएमडीटीए यांच्या संलग्नतेने आयोजित पीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन एटीपी चॅलेंजर 100 पुरुष टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये अंतिम फेरीत चेक प्रजासत्ताकच्या 22 वर्षीय दलिबोर सेव्हर्सिना याने सहाव्या मानांकित अमेरिकेच्या ब्रँडन होल्टचा 7-6 (3), 6-1 असा टायब्रेकमध्ये पराभव करून विजेतेपद संपादन केले.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस संकुलात पार पडलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये एकेरीत अंतिम फेरीत दलिबोरने ब्रँडनचे आव्हान 1 तास 29 मिनिटांत मोडीत काढले. पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करत आपापल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे सामन्यात 6-6 अशी बरोबरी झाली. टायब्रेकमध्ये दलिबोरने सुरेख खेळ करत आपले वर्चस्व कायम राखले व हा सेट 7-6(3) असा जिंकून विजेतेपदाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. दुसऱ्या सेटमध्येदेखील ब्रँडनला सूर गवसला नाही. दुसऱ्या गेममध्ये दलिबोरने ब्रँडनची सर्व्हिस ब्रेक केली व आघाडी घेतली.
त्यानंतर दलिबोरने आपला आक्रमक खेळ कायम राखत चौथ्या गेममध्ये दलिबोरने ब्रँडनची पुन्हा सर्व्हिस ब्रेक केली. अखेर पाचव्या गेममध्ये ब्रँडनने दलिबोरची सर्व्हिस रोखली व हि आघाडी 4-1 ने कमी केली. त्यानंतर दलिबोरने आपला दबदबा कायम ठेवत सहाव्या गेममध्ये ब्रँडनची पुन्हा सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-1 असा जिंकून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
स्पर्धेतील विजेत्याला 100 एटीपी गुण आणि 22730 डॉलर्स (19.90 लाख रुपये), तर उपविजेत्याला 60 एटीपी गुण आणि 13,350 डॉलर्स(11.70 लाख रुपये) पारितोषिक देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीएमआरडीएचे राहुल महिवाल (आयएएस), एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर आणि एमएसएलटीएचे सह सचिव राजीव देसाई, शितल भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एटीपी निरीक्षक उझबेकिस्तानचे आंद्रे कॉर्निलोव्ह आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: मुख्य ड्रॉ: एकेरी: अंतिम फेरी:
दलिबोर सेव्हर्सिना(चेक प्रजासत्ताक)वि.वि.ब्रँडन होल्ट [6] (अमेरिका) 7-6 (3), 6-1
महत्त्वाच्या बातम्या-
विराट कोहलीचा विश्वविक्रम; एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वश्रेष्ठ खेळाडूंच्या पुढे झेप
हार्दिक पांड्याचा विक्रम; भारत-पाकिस्तान सामन्यात चमकदार कामगिरी
भारतीय गोलंदाजांचा जलवा.,पाकिस्तानने दिल भारताला 242 धावांचं आव्हान
Comments are closed.