अंधेरी गॅस गळतीप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा

अंधेरी पूर्व येथील शेर-ए-पंजाब कॉलनीत महानगर गॅस पाइपलाइनचे नुकसान होऊन गॅस गळती झाली. याप्रकरणी संबंधित जे.सी.बी. चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संबंधित कंत्राटदार तसेच ड्रायव्हरला अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत दिली. शिवसेना आमदार अनिल परब यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

Comments are closed.