फॉरएव्हर केमिकल्समुळे जीन्समध्ये धोकादायक बदल
कॅन्सर अन् गंभीर आजारांचा वाढू शकतो धोका
मानवी जीवन सुलभ करण्यासाठी वापरण्यात येणारी अनेक रसायनं आता आरोग्यासाठी गंभीर धोका ठरू लागली आहेत. फॉरएवर केमिकल्स म्हणजेच पीएफएएस (पर-एंड पॉली फ्लुओरो एल्काइल सब्स्टेंसेस) मानवी जीनच्या हालचालींमध्ये असे बदल घडवून आणतात, जे कॅन्सर, अल्झायमर, ऑटोइम्यून आजार आणि संक्रमणांचा धोका वाढवू शकतात असे एका नव्या संशोधनात दिसून आले आहे. हे अध्ययन अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ एरिजोनाच्या वैज्ञानिक मेलिसा फर्लांग यांच्या नेतृत्वात करण्यात आले. याचे निष्कर्ष आंतरराष्ट्रीय नियतकालिक एनव्हायरनमेंटल रिसर्चमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. हे संशोधन प्रारंभिक प्रयत्नांपैकी एक असून यात पीएफएएसला मायक्रो आरएनएमध्ये होणाऱ्या बदलाशी जोडण्यात आले आहे.
मायक्रो आरएनए अत्यंत सुक्ष्म अणू असतात, जे जीनच्या हालचालींना नियंत्रित करतात. अध्ययनानुसार या अणूंमध्ये बदल अनेक गंभीर आजारांशी निगडित असल्याचे आढळून आले आहे. संशोधकांनी अमेरिकेच्या 303 अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या रक्तनमुन्यांची तपासणी केली. यात 9 प्रमुख प्रकारचे फॉरएवर केमिकल्स आणि त्यांच्याशी संबंधित मायक्रो आरएनएच्या हालचालींचे विश्लेषण करण्यात आले.
या गंभीर आजारांचा धोका
कॅन्सर : ब्लड कॅन्सर, ब्लॅडर, लिव्हर, थायरॉयड आणि ब्रेस्ट कॅन्सरशी संबंध आढळून आला.
न्यूरोलॉजिकल रोग : अल्झायमरसारख्या मेंदूशी संबंधित आजारांशी कनेक्शन समोर आले.
ऑटोइम्यून आणि संक्रमण : ल्यूपस, अस्थमा आणि क्षयरोगासारख्या आजारांशी संबंध दिसून आला. पीएफओएस (परफ्लुओरो आक्टेन) नावाचा एक सामान्य फॉरएव्हर केमिकलला
कॅन्सरशी निगडित मायक्रो आरएनएच्या कमी स्तराशी जोडण्यात आले.
फॉरएवर केमिकल्स म्हणजे काय?
पीएफएएस सुमारे 12,000 रासायनिक यौगिकांचा समूह आहे, त्यांचा वापर पाणी, तेल आणि डागांपासून वाचविणाऱ्या उत्पादनांमध्ये केला जातो. वॉटरफ्रूफ कपडे, नॉन-स्टिक कुकवेयर, इलेक्ट्रॉनिक्स, क्लीनिंग प्रॉडक्ट्स, अग्निशमन कर्मचाऱ्यांचे फोम आणि सुरक्षा गियरमध्ये त्यांचा वापर होतो. ही रसायने पर्यावरणात अत्यंत मंदगतीने तुटतात आणि दीर्घकाळापर्यंत कायम राहतात. याचमुळे त्यांना फॉरएवर केमिकल्स म्हटले जाते.
चकित करणारे निष्कर्ष
पीएफएएस ज्या व्यापक स्तरावर जीन आणि जैविक प्रक्रियांना प्रभावित करत आहे, ते चकित करणारे आहे. ही रसायने गंभीर आजारांच्या जोखिमीला मोठ्या प्रमाणात वाढवत असल्याचे यातून स्पष्ट होते असे अध्ययनाच्या प्रमुख वैज्ञानिक डॉ. मेलिसा फर्लोंग यांचे सांगणे आहे.
Comments are closed.