हर्णे येथील समुद्राच्या पाण्यात मृत पावलेला डॉल्फीन मासा आढळला

हर्णे येथील समुद्राच्या पाण्यात मृतावस्थेत असलेला एक डॉल्फीन मासा आढळून आला. हर्णे येथील सामाजिक कार्यकर्त्याने आपल्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने मृतावस्थेत पाण्यात तरंगत असलेल्या त्या डॉल्फीन माशाला समुद्राच्या पाण्यातून काठावरील खडकावर बाहेर काढले तो पर्यंत सांयकाळ झाली होती. दरम्यान त्या सामाजिक कार्यकर्त्याने वनविभागाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही. समुद्राच्या पाण्याला रात्री भरती आल्यामुळे त्यात तो पुन्हा समुद्राच्या पाण्यात वाहून गेला.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे बंदर हे मासेमारीसाठी जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचे बंदर ओळखले जाते. अशा या बंदरात सकाळ संध्याकाळ असे दोनदा मासळीची लिलाव प्रक्रिया पार पडते. त्यामुळे हर्णे बंदर तसे कायमच गर्दीने गजबजलेले असते. अशा या बंदरातील समुद्राच्या पाण्यात डॉल्फिन विहार करत असल्याचे अनेकदा अनेकांच्या दृष्टीत पडतात. याचाच अर्थ हर्णे समुद्राच्या पाण्यात डॉल्फीन मासे आहेत. अशा या डॉल्फिन माशांना एखाद्या जहाजाचा जोरदार धक्का बसला तर अनेकदा ते गतप्राण होऊन समुद्राच्या लाटांबरोबर समुद्राच्या किनाऱ्यावर बाहेर फेकले जातात. अशाच प्रकारे शनिवारी 6 सप्टेंबर रोजी सायंकाळी उशिरा हर्णे बत्ती ( दिपगृहा जवळ ) सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या समोर एक लहान डॉल्फीन मासा पाण्यात तरंगत असल्याचे येथील मासेमारांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ हर्णे येथील सामाजिक कार्यकर्ते आणि हर्णे ग्राम पंचायतीचे माजी सरपंच अस्लम अकबानी यांच्या कानावर ही घटना घातली त्यानंतर लागलीच घटना स्थळी अकबानी यांनी येवून आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने समुद्राच्या पाण्यात तरंगत असलेल्या डॉल्फिन माशाला पाण्यातून खडपावर बाहेर ओढून काढले तर मासा मृत असल्याचे त्यांच्या लक्षात आले . अकबानी यांनी तत्काळ वन विभागाला संपर्क करण्याचा सतत प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही. दरम्यान रात्री समुद्राच्या पाण्याला आलेल्या भरतीच्या लाटेत खडपावर काढून ठेवलेला डॉल्फीन समुद्रात पून्हा वाहून गेला. स्थानिकांकडून मिळालेल्या माहीतीनुसार साधारणपणे साठ ते सत्तर किलो वजन आणि पाच ते सहा फुट लांबीचा डॉल्फीन होता. त्याला मार लागल्याच्या जखमा कुठेच दिसून येत नव्हत्या.
Comments are closed.