'दर्पणकार' पुरस्कार डॉ.किरण ठाकूर यांना प्रदान

डॉ.किरण ठाकुर यांचे पत्रकारितेतील योगदान अतुलनीय : डॉ. विनय सहस्रबुद्धे

त. भा. प्रतिनिधी/ नाशिक

पत्रकारितेच्या क्षेत्रातील नैतिक मूल्यांची जपणूक करणारे आणि ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर यांना नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘दर्पणकार बाळशास्त्राr जांभेकर पत्रकारिता पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे (घ्ण्ण्R) अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. दिलीप फडके यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला.

डॉ.किरण ठाकुर यांचे पत्रकारितेत योगदान अतुलनीय

पत्रकारितेतील योगदानाबद्दल बोलताना डॉ. विनय सहस्रबुद्धे म्हणाले की, डॉ. किरण ठाकुर यांनी प्रादेशिक पत्रकारितेत दिलेले योगदान अतुलनीय आहे. सकारात्मकतेची रेषा जेवढी मोठी केली जाईल, तेवढी नकारात्मकता आपोआप कमी होईल, हे डॉ. ठाकुर यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे. डॉ. किरण ठाकुर यांच्या संपादकीय कारकिर्दीतील मूल्यांची जपणूक आणि समाजाभिमुख लेखनाचे यावेळी मान्यवरांकडून कौतुक करण्यात आले.

पत्रकारिता हे समाजप्रबोधनाचे प्रभावी शस्त्र : डॉ.किरण ठाकूर

पुरस्काराला उत्तर देताना डॉ. किरण ठाकुर यांनी आपली पत्रकारितेतील भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, पत्रकारिता हे केवळ वार्तांकनाचे माध्यम नसून ते समाजजागृतीचे एक प्रभावी शस्त्र आहे. सत्यनिष्ठ आणि अभ्यासपूर्ण लेखनाची परंपरा पुढे नेण्याचा संकल्प त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

Comments are closed.