यंदा राज्यात पाच दसरा मेळावे; उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदेंच्या भाषणाकडे लक्ष

नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात शस्त्र पूजनाची ही तयारी पूर्ण झाली आहे.. सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांचे आगमन झाल्यानंतर ते शस्त्र पूजन करतील.. शस्त्रपूजनाच्या ठिकाणी भारताच्या तलवारी, भाले, ढाल या पारंपरिक शस्त्रांसह अत्याधुनिक शस्त्रे ज्यामध्ये “ड्रोन ची प्रतिकृती” सोबतच “पिनाका रॉकेट ची प्रतिकृती” ही ठेवण्यात आली आहे.. त्यामुळे शस्त्रपूजनात परंपरेसह आधुनिक काळात आत्मरक्षणासाठी आवश्यक आणि तंत्रज्ञानावर आधारित शस्त्र ही किती आवश्यक आहे हेच सांगण्याचा प्रयत्न शस्त्र पूजनाच्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या विविध शस्त्रांच्या प्रतिकृतीवरून लक्षात येत आहे…

Comments are closed.