DCM Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray rrp
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीमधून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची चर्चा होताना दिसत आहे. तसे संकेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीचे संकेत दिले आहेत.
मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळालं, मात्र यानंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात बहुमताने महायुतीचं सरकार आलं. यानंतर आता महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील काही महिन्यात होण्याची शक्यता आहे. मात्र विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीमधून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची चर्चा होताना दिसत आहे. तसे संकेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीचे संकेत दिले आहेत. याप्रकरणी प्रतिक्रिया देताना त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. (DCM मराठी criticizes Uddhav Thackeray)
ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, काहीजण म्हणत होते की, सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळत नसेल तर जनतेच्या न्यायालयात जाऊ. पण विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 60 आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे आता खरी शिवसेना कुणाची हे जनतेने ठरवले आहे. मात्र काही जणांना सत्तेचे स्वप्न पडले होते. त्यांनी मंत्रीमंडळ तयार करून हाॅटेलही बुक केले होते. पण, जनतेने आणि लाडक्या बहिणींनी त्यांचे बुकींग रद्द केले, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगवला.
– Advertisement –
हेही वाचा – BMC Election 2025 : पालिका निवडणूक ठाकरेंसाठी कठीण; विचारात न घेतल्याने नगरसेवकांची नाराजी
एकनाथ शिंदे म्हणाले की, लाडकी बहीण, भाऊ, शेतकरी, युवक, जेष्ठ अशा सर्वांनी आमच्यावर भरभरून मतांचा वर्षाव केला. मी आधीच सांगितल्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीत विरोधक चारही मुंड्या चीत झाले. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीचा भगवा फडकवायचा आहे, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
– Advertisement –
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार?
दरम्यान, राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद अशा सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांची पंचवार्षिक मुदत काही वर्षांपुर्वीच संपुष्टात आली आहे. त्यामुळे या सर्वच ठिकाणी प्रशासकीय राजवट अस्तित्वात आली असून प्रशासनामार्फत स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरू आहे. काही पालिकांच्या निवडणुका तीन ते चार वर्षांपासून होऊ शकलेल्या नाहीत. सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर दीड महिन्यापूर्वी विधानसभा निवडणुकही झाली. त्यामुळे आता येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, अशी शक्यता आहे. या निवडणुकांकडे राजकीय वर्तुळासह जनतेचे लक्ष लागले आहे. मात्र या निवडणुका नेमक्या कधी होणार याबाबत काहीच माहिती समोर येताना दिसत नाही.
हेही वाचा – MVA : तोच आमचा गाफिलपणा, विधानसभेतील पराभवावरून काँग्रेस नेत्याचे स्पष्ट भाष्य
Comments are closed.