DCM Eknath Shinde on Pakistani Citizens Missing News


जम्मूमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांना 1 मे च्या आधी भारत सोडण्याचं फर्मान काढलं आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात असलेले 107 पाकिस्तानी नागरिक गायब असल्याची बातमी काही वृत्तवाहिन्यांनी चालवली. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोखठोक वक्तव्य केलं आहे.

बुलढाणा : जम्मूमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांना 1 मे च्या आधी भारत सोडण्याचं फर्मान काढलं आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात असलेले 107 पाकिस्तानी नागरिक गायब असल्याची बातमी काही वृत्तवाहिन्यांनी चालवली. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोखठोक वक्तव्य केलं आहे. ते बुलढाणा येथे पत्रकारांशी संवाद साधत होते. (DCM मराठी on Pakistani Citizens Missing News)

शिंदेंचा नेमका इशारा काय?

एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय की, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं आहे की, पाकिस्तानी नागरिकांनी तत्काळ देश सोडावा. महाराष्ट्रदेखील ज्यांची नोंद झाली त्यांनी देश सोडावा, असं फर्मान सरकारने काढले आहेत. मुख्यमंत्र्यांनीदेखील इशारा दिलेला आहे. तर, मीसुद्धा भाषणात बोललो की, 107 लोकं जे कुठे असतील त्यांना पोलीस शोधतील आणि तिथेच ठोकतील, अशा शब्दात महाराष्ट्रात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट इशाराच दिला आहे.

फडणवीस म्हणतात, कोणीही बेपत्ता नाही 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गृहमंत्री म्हणाले की, पाकिस्तानी नागरिकांसंदर्भात कृपया चुकीच्या बातम्या करु नका. माध्यमांनी 107 नागरिक हरवले असल्याच्या बातम्या केल्या आहेत. परंतु राज्यातील एकही पाकिस्तानी नागरिक हरवले नाहीत. सर्वच पाकिस्तानी नागरिक सापडले आहेत. आता एकही पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात राहणार नाही. आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत सर्वांना पाकिस्तानात पाठवण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी अन्य विषयांवरही भाष्य केलं आहे. फडणवीस म्हणाले की, शहरातील फ्लेक्स काढायला हवेत. त्यामुळे शहरांचं सौंदर्य खराब होतं. तसंच राज्यातील पाणी टंचाईवर बोलताना ते म्हणाले की, एप्रिल- मे महिन्यांत पाणीसाठा कमी असतो. ही परिस्थिती पहिल्यांदा आलेली नाही. दरवर्षी अशी परिस्थिती असते. मागील वर्षीही एप्रिल-मे महिन्यांत 32 टक्के पाणीसाठा होता. यावर्षी तो 38 टक्के पाणीसाठा आहे. म्हणजेच मागील वर्षापेक्षा चांगली परिस्थिती आहे. राज्यातील मोठ्या धरणांमध्ये पाणीसाठा चांगला आहे. परंतु लहान धरणांमध्ये जलसाठा कमी झाला आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

(हेही वाचा Nitesh Rane : आधी धर्म विचारा आणि मगच खरेदी करा, पहलगाम हल्ल्यानंतर काय म्हणाले नितेश राणे )



Source link

Comments are closed.