दिलेले टार्गेट पूर्ण करा, नाही तर लाल मिरची खा! चीनमधील कर्मचाऱ्यांना कंपनीचे अजब फर्मान
टार्गेट पूर्ण करण्यासाठी चीनमधील एका कंपनीने कहर केला. टार्गेट पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिक्षा म्हणून तिखट लाल मिरची खाण्याचे फर्मान काढले. कंपनीच्या या नव्या फर्मानविरुद्ध कर्मचाऱ्यांनी दबक्या आवाजात निषेध केला आहे. चीनमधील चेंगदू येथील एका कॉर्पोरेट कंपनीत कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा अजब निर्णय लागू करण्यात आला आहे. टार्गेट पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला जात आहे. जे कर्मचारी टार्गेट पूर्ण करत नाही त्यांना लाल मिरची खायला सांगितले जात आहे. कंपनीतील दोन महिला कर्मचाऱ्यांनी आपले टार्गेट पूर्ण केले नाही. त्यामुळे कंपनीने त्यांना लाल मिरची खाण्यास सांगितले. मिरच्या खाल्ल्यानंतर या दोन महिला कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले.
चीनमध्ये डेथ चिलीस हा नवीन प्रकार नाही. या ठिकाणी पूर्वीपासून अशा शिक्षा दिल्या जातात. परंतु आता या शिक्षेवर अनेक जण टीका करू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी चीनमधील एका कार्यालयाबाहेर कर्मचारी बॉसच्या केबिनबाहेर लोटांगण घालतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओवर नेटीजन्सकडून कठोर शब्दात टीका करण्यात आली होती.
Comments are closed.