बिजली वाघिणीचा वृद्धापकाळाने मृत्यू, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील डरकाळी कायमची बंद
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात एक दुःखद घटना घडली. गेल्या 10 वर्षांपासून या उद्यानाच्या परिवाराचा एक भाग असलेली आणि आपल्या ऐटदार शरीरयष्टीने पर्यटकांना भुरळ पाडणारी बिजली (टी-2) या वाघिणीने अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळाने वयाच्या 18व्या वर्षी तिचा मृत्यू झाला.
बिजली 11 सप्टेंबर 2016 रोजी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिवारात सामील झाली होती. पेंच व्याघ्र प्रकल्पातून तिला येथे आणण्यात आले होते. तेव्हापासून बिजली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिवाराचा महत्त्वाचा भाग होती. 10 वर्षं ती या उद्यानात मोठ्या ऐटीत वावरली. अल्पवधीतच तिने पर्यटकांवर आपली भुरळ पाडली होती. तसेच तिची नियमित देखभाल करणारे पशुवैद्यकीय अधिकारी, वन अधिकारी-कर्मचाऱ्यांसोबत तिचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते. बिजलीचे वृद्धापकाळाने निधन झाले असले तरी तिचे शवविच्छेदन करण्यात येणार असून मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यात येणार आहे.
Comments are closed.