राजस्थान मुख्यमंत्री यांना मृत्यूचा धोका

वृत्तसंस्था/जयपूर

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि राजस्थान राज्य क्रीडा परिषदेचे अध्यक्ष आयएएस नीरज के. पवन यांना गुरुवारी सकाळी जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या. जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर बॉम्बस्फोट करण्याचा इशारा देऊन ही धमकी ई-मेलद्वारे पाठवण्यात आली आहे. या धमकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांनी एसएमएस स्टेडियम, मुख्यमंत्री निवासस्थान आणि इतर संवेदनशील ठिकाणी सुरक्षा वाढवली आहे. पोलीस सायबर सेल मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा आयपी शोधण्याचा प्रयत्न करत आहे. सदर मेल व्हीपीएनद्वारे पाठवण्यात आल्यामुळे अचूक स्थान सापडू शकले नाही. धमकीच्या ई-मेलचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रीय एजन्सींनाही सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.

Comments are closed.