19 वर्षाच्या पोरानं चौकार-षटकारांचा पाऊस पाडला, भारतीय गोलंदाजांना रडवलं, पदार्पण सामन्यात ठोकल
सॅम कॉन्स्टास इंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथी कसोटी : मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात खेळल्या जात असलेल्या बॉक्सिंग-डे कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी, दोन्ही संघांच्या प्लेइंग 11 मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे, ज्यामध्ये टीम इंडियामध्ये शुभमन गिलच्या जागी वॉशिंग्टन सुंदरचा समावेश करण्यात आला आहे, तर ऑस्ट्रेलियाने सॅम कॉन्स्टास आणि जोश हेझलवूडचा समावेश केला आहे. बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियन खेळाडू सॅम कॉन्स्टासने अर्धशतक झळकावले आहे.
सॅम कोन्स्टासने पदार्पणातच उल्लेखनीय ५० धावा केल्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रेस्ट टॅप केला! #AUSWIN | #MilestoneMoment | @nrmainsurance pic.twitter.com/y1tp4rT9qG
— cricket.com.au (@cricketcomau) 26 डिसेंबर 2024
19 वर्षाच्या सॅम कोन्स्टासने पदार्पण कसोटीत सामन्यात तुफानी फलंदाजी करत संघाला चांगली सुरूवात करून दिली. तो केवळ सिराजविरुद्धच नाही तर बुमराहविरुद्धही आक्रमक फलंदाजी केली. त्याने चौकार आणि षटकारांचा वर्षाव केला आणि अर्धशतक झळकावले. त्याने केवळ 52 चेंडूत आपले अर्धशतक पुर्ण केले. यादरम्यान, त्याने 6 चौकार आणि 2 षटकार मारले. ऑस्ट्रेलियाने 14 षटकात एकही विकेट न देता 77 धावा केल्या आहेत.
बुमराहपासून ते सिराजपर्यंत सर्वांनाच पहिल्या 1 तासात कॉन्स्टासने चांगला धुतला आहे. सॅम कॉन्स्टासने डावाच्या 7व्या षटकात 2 चौकार आणि एक षटकार मारून जसप्रीत बुमराहला अनोख्या आणि धडाकेबाज पद्धतीने चकित केले.
आम्ही काय पाहत आहोत!
सॅम कोन्स्टासने नुकतेच जसप्रीत बुमराहला षटकार मारले#AUSWIND | #PlayOfTheDay | @nrmainsurance pic.twitter.com/ZuNdtCncLO
— cricket.com.au (@cricketcomau) 26 डिसेंबर 2024
भारताविरुद्ध सुरू असलेल्या या कसोटी मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये उस्मान ख्वाजासोबत डावाची सलामी देणाऱ्या नॅथन मॅकस्विनीला ऑस्ट्रेलियन संघाने त्याच्या खराब कामगिरीमुळे उर्वरित 2 सामन्यांसाठी संघात स्थान दिले नाही, ज्यात 19 वर्षांच्या सॅम कॉन्स्टासचा संघात समावेश होता. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर जेव्हा सॅमला त्याच्या कसोटी पदार्पणात बॅगी ग्रीन कॅप देण्यात आली, तेव्हा तो ऑस्ट्रेलियासाठी या फॉरमॅटमधील चौथा सर्वात तरुण खेळाडू ठरला. सॅमने वयाच्या 19 वर्षे 85 दिवसांत कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या बाबतीत सॅमने क्लेम हिलचा विक्रम मोडला आहे, ज्याने 1896 साली वयाच्या 19 वर्षे 96 दिवसांत कसोटी पदार्पण केले होते.
ऑस्ट्रेलियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू
इयान क्रेग – 17 वर्षे 239 दिवस (वर्ष 1953)
पॅट कमिन्स – 18 वर्षे 193 दिवस (2011)
टॉम गॅरेट – 18 वर्षे 232 दिवस (वर्ष 1877)
सॅम कॉन्स्टास – 18 वर्षे 85 दिवस (वर्ष 2024)
क्लेम हिल – 19 वर्षे 96 दिवस (वर्ष 1896)
हे ही वाचा –
अधिक पाहा..
Comments are closed.