पहिल्या डेक्कन इलाईट कप बास्केटबॉल स्पर्धेत डेक्कन जिमखाना अ संघाला विजेतेपद
डेक्कन जिमखाना यांच्या वतीने आयोजित पहिल्या डेक्कन इलाईट कप बास्केटबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात डेक्कन जिमखाना अ संघाने विजेतेपद संपादन केले. डेक्कन जिमखाना बास्केटबॉल कोर्ट या ठिकाणी पार पडलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात अंतिम फेरीत चुरशीच्या लढतीत डेक्कन जिमखाना अ संघाने नहाटा संघाचा 71-69 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपद पटकावले. सामन्यात दोन्ही संघानी तोडीस तोड खेळ केला.
विजयी संघाकडून आर्यन प्रजापती (29गुण), विवान अगरवाल(15गुण) यांनी सुरेख कामगिरी केली. पराभूत संघाकडून अमेय दारवटकर (17गुण) याने दिलेली लढत अपुरी ठरली मध्यंतराला नहाटा संघाकडे डेक्कन जिमखाना संघाविरुद्ध 17-12 अशी आघाडी होती.
तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत राहुल सिंग बास्केटबॉल अकादमी(आरएसबीए) संघाने एबीसी संघाचा 44-28 असा पराभव करून तिसरा क्रमांक पटकावला. आरएसबीए संघाकडून युवीत जैन(18गुण) याने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक व 40,000/- रुपये, तर उपविजेत्या संघाला करंडक व 20,000/- रुपये अशी पारितोषिके देण्यात आली.
याशिवाय तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या संघाला करंडक व 10,000/- रुपये आणि मोस्ट व्हॅल्युएबल पुरस्कार डेक्कन जिमखानच्या आर्यन प्रजापती याला करंडक व 5,000/- अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण सेफमॅक्सचे आप्पासाहेब वीर आणि स्कॉनचे मनोज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
बाहेर पडा: शेवटची फेरी:
मुले:डेक्कन जिमखाना अ: 71 (आर्यन प्रजापती 29 गुण, विवान अगरवाल 15 गुण) वि.वि.नहाटा: 69(अमेय दारवटकर 17गुण); मध्यंतर: 12-17;
तिसऱ्या क्रमांकासाठी लढत: राहुल सिंग बास्केटबॉल अकादमी (आरएसबीए): 44(युवीत जैन 18गुण) वि.वि.एबीसी: 28 (दक्ष शर्मा 13गुण); मध्यंतर: 14-05.
Comments are closed.