पुणे जिल्हा फुटबॉल संघटना सुपर डिव्हीजन श्रेणी 2026 स्पर्धेत डेक्कन इलेव्हन एफसी, युकेएम कोथरूड एफसी संघांचे विजय
पुणे जिल्हा फुटबॉल संघटना यांच्या वतीने आयोजित प्रतिष्ठित अशा सुपर डिव्हीजन श्रेणी फुटबॉल 2026 स्पर्धेत साखळी फेरीत डेक्कन इलेव्हन एफसी, युकेएम कोथरूड एफसी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव केला. बावधन येथील हॉटफूट फुटबॉल मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात डेक्कन इलेव्हन एफसी संघाने चेतक एफसी संघाचा 7-4 असा पराभव करून सनसनाटी विजय मिळवला.
डेक्कनकडून ईशान सुमंत(10,39 मि.), शिवराज देशमुख(40,62 मि.) याने दोन गोल तर, असीम हुल्याळकर(25 मि.), बलराज जगताप(40 मि.), पुष्कराज पवार(52 मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. चेतककडून निखिल पडवळ(17,47 मि.)याने दोन गोल, गौरव जाधव(36 मि.), मंगेश शिंदे(74 मि.)यांनी प्रत्येकी एक गोल केला.
दुसऱ्या लढतीत शौर्यजीत पाटील(2मि.), रुद्राक्ष(37मि.), राजवीर गुरव(42मि.), युग झिंझे(54मि.), डॅनियल चेत्तीयार(63मि.) यांनी केलेल्या विजयी कामगिरीच्या जोरावर युकेएम कोथरूड एफसी संघाने इंद्रायणी एससी संघाचा 5-3 असा पराभव केला. अन्य संघर्षपूर्ण लढतीत रेंजहिल्स यंग बॉईज एफसी संघाने जीओजी एफसी संघाला 3-3 असे बरोबरीत रोखले.
रेंजहिल्स यंग बॉईज एफसी संघाकडून नीरव पिल्ले(5मि.), नील संघवी(24मि.), निकिल नारायणन(42मि.) यांनी तर, जीओजी एफसीकडून सतीश हवालदार(16, 53मि.), सुमित काटे(60मि.) यांनी गोल केले.
बाहेर काढा-
साखळी फेरी- रेंजहिल्स यंग बॉईज एफसी: 3 (नीरव पिल्ले 5 मिनिटे, नील संघवी 24 मिनिटे, निखिल नारायणन 42 मिनिटे) ड्रॉ वि. GOG FC: 3 (सतीश कॉन्स्टेबल 16, 53 मिनिटे, सुमित काटे 60 मिनिटे).
केएम कोथरूड एफसी: 5(शौर्यजीत पाटील 2मि., रुद्राक्ष 37मि., राजवीर गुरव 42मि., युग झिंझे 54मि., डॅनियल चेत्तीयार 63मि.) वि.वि.इंद्रायणी एससी: 3(जगत राज 6, 26मि., आयुष दिपक 69मि.).
डेक्कन इलेव्हन एफसी: 7(ईशान सुमंत 10, 39मि., असीम हुल्याळकर 25मि., बलराज जगताप 40मि., शिवराज देशमुख 40, 62मि., पुष्कराज पवार 52मि.)वि.वि.चेतक एफसी: 4(निखिल पडवळ 17, 47मि., गौरव जाधव 36मि., मंगेश शिंदे 74मि.)
Comments are closed.