पंतप्रधान मोदींनी इस्रायल सोडल्यानंतर इराणवर हल्ला करण्याचा निर्णय घेण्यात आला, इस्रायली परराष्ट्र मंत्र्यांचे वक्तव्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील इस्रायल दौऱ्यादरम्यान त्यांना इराणवरील लष्करी हल्ल्यांबाबत कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती, असं इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिदोन सार यांनी म्हटलं आहेत. नवी दिल्लीत आयोजित रायसीना डायलॉगमध्ये (Raisina Dialogue) व्हर्चुअल पद्धतीने सहभागी झाले असताना त्यांनी ही माहिती दिली. इराणवर हल्ला करण्याचा अंतिम निर्णय पंतप्रधान मोदी यांचा दौरा संपल्यानंतर घेण्यात आला होता, असं ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांचा दोन दिवसांचा इस्रायल दौरा २६ फेब्रुवारी २०२६ रोजी संपन्न झाला होता. या दौऱ्यात दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करण्यात आली. मात्र मोदी मायदेशी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी म्हणजे २८ फेब्रुवारी रोजी इस्रायल आणि अमेरिकेनं इराणविरोधात संयुक्त लष्करी मोहीम राबवली. या भीषण हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांचा मृत्यू झाला होता. या घडामोडींमुळे जागतिक राजकारणात हिंदुस्थानची भूमिका काय होती, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या.
यावर बोलताना परराष्ट्र मंत्री गिदोन सार म्हणाले की, “पंतप्रधान मोदी आणि हिंदुस्थानसोबत इस्रायलचे अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. मात्र आम्ही त्यांना या मोहिमेबद्दल माहिती देऊ शकलो नाही, कारण हल्ला करण्याचा निर्णय शनिवारी पहाटे घेण्यात आला, जेव्हा मोदींचा दौरा आधीच संपला होता.”
Comments are closed.