100 धावा झाल्या की डाव घोषित करा,” रवि शास्त्रींचा सल्ला भारताला गुवाहाटीत विजय मिळवून देऊ शकेल का?
कसोटी सामन्यात विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA) दुसऱ्या कसोटीमध्ये दोन दिवसांत 180 षटकं पूर्ण व्हायला हवी होती. पण खराब प्रकाशामुळे आतापर्यंत फक्त 157.2 षटकं टाकली गेली आहेत. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 489 धावांवर संपला. भारताला ही मालिका 1-1 ने बरोबरीत आणायची असेल, तर गुवाहाटी कसोटी जिंकणं अत्यावश्यक आहे.
दरम्यान, रवि शास्त्री (Ravi Shastri) यांनी एक मोठं भाकीत करत सांगितलं की, भारताने आपला पहिला डाव सुमारे 400 धावांवर घोषित करावा.
दुसऱ्या कसोटीदरम्यान कमेंट्री करताना शास्त्री म्हणाले, भारतीय संघाने उद्या मोठा निर्णय घ्यायला हवा. नवीन चेंडू वाचवल्यानंतर स्कोअरबोर्ड पुढे नेण्यावर लक्ष द्यावं आणि दक्षिण आफ्रिकेला सामना जिंकण्यासाठी भाग पाडावं. तुम्हाला कठोर निर्णय घ्यावा लागेल, अगदी लीड न मिळाल्यासही डाव घोषित करावा लागू शकतो.
शास्त्री पुढे म्हणाले, दुसऱ्या डावात त्यांना (दक्षिण आफ्रिकेला) शक्य तितक्या लवकर बाद करण्याचा प्रयत्न करा. हा धोका तुम्हाला घ्यावाच लागेल. 489 धावांचा स्कोअर पार करण्यासाठी तुम्ही वेळ घालवलात, तर सामना तुमच्या हातातून जाऊ शकतो. भारताला 80, 90 किंवा अगदी 100 धावा पिछाडीवर असतानाही डाव घोषित करावा लागू शकतो.
शास्त्रींची ही रणनीती कितपत चालेल हे स्पष्ट नाही, कारण तिसऱ्या दिवशी पिचवर क्रॅक दिसत नसल्यास चौथ्या दिवशीही फारसा स्पिन मिळणार नाही. अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिका फायदेशीर ठरू शकते. तसंच, अलीकडच्या काही कसोटी सामन्यांमध्ये भारताचा लक्ष्याचा पाठलाग (चेजिंग) करण्याचा रेकॉर्डही चांगला नाही. गेल्याच सामन्यात भारत 124 धावांचं सोपं लक्ष्य पूर्ण करू शकला नव्हता.
Comments are closed.