दीपिका पादुकोण गरोदरपणातही काम करत राहणार; सध्या ‘राका’ चित्रपटातील अॅक्शन सीनमध्ये व्यस्त
दीपिका पादुकोण दुसऱ्यांदा आई होणार असल्याची बातमी, नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली. त्यानंतर रणवीर आणि दीपिका दोघांवर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव झाला. परंतु यातील महत्त्वाची बाब म्हणजे गरोदर असतानाही, दीपिका ही कामातून ब्रेक घेणार नाही असे समजते.
इंडस्ट्रीतील सूत्रांनुसार, दीपिका गरोदरपणातही तिच्या व्यावसायिक जबाबदाऱ्यांना प्राधान्य देणार आहे. ती सध्या ‘राका’ चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. दीपिका ‘राका’ चित्रपटासाठी काही ॲक्शन सीक्वेन्सचे चित्रीकरण करत आहे. दीपिका सध्या दोन मोठ्या प्रकल्पांमध्ये कार्यरत आहे. अल्लू अर्जुन आणि ॲटली यांचा ‘राका’ आणि शाहरुख खानचा ‘किंग’. परंतु आता ती गरोदर असताना या दोन चित्रपटांच्या शूटींगच्या वेळा कशी सांभाळणार अशी चित्रपटसृष्टीत जोरदार चर्चा सुरू आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, दीपिका पादुकोण सध्या ‘राका’ चित्रपटासाठी काही महत्त्वाच्या ॲक्शन दृश्यांचे शूटींग करत आहे. हे शूट करण्यासाठी दीपिका आणि चित्रपटाच्या निर्मात्यांनी सर्व आवश्यक खबरदारी घेतली आहे. ‘किंग’ आणि ‘राका’ या दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे सध्याच्या घडीला या चित्रपटांचे काही शेवटच्या दृश्यांचे चित्रीकरण सुरू आहे. त्यामुळे दोन्ही चित्रपटांसाठी वेळापत्रकानुसार दीपिकाचे उपस्थित असणे हे गरजेचे आहे. त्यामुळेच दीपिका गरोदर असतानाही शूटिंग सुरू ठेवणार असल्याचे समजते.
दीपिका आणि रणवीरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास, बऱ्याच काळापासून डेटिंग केल्यानंतर या जोडप्याने नोव्हेंबर २०१८ मध्ये इटलीमध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नानंतर जवळपास सहा वर्षांनी, सप्टेंबर २०२४ मध्ये दीपिकाने त्यांची पहिली मुलगी दुआला जन्म दिला. दुआ आता दीड वर्षांची आहे आणि लवकरच पुन्हा एकदा चिमुकला पाहुणा घरी येणार आहे.
Comments are closed.