दीप्ती शर्माचा वर्ल्ड कप शो! बॉल-बॅट दोन्हीनं गाजवलं मैदान; युवराज सिंगची बरोबरी

क्रिकेटच्या इतिहासात भारताने अनेक सुवर्णपाने लिहिली आहेत. आता त्या पानांवर एक नवीन नाव कोरलं गेलंय ते म्हणजे दीप्ती शर्माच. आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप 2025 मध्ये दिप्तीने असा कहर माजवला की जग थक्क झालं. नवी मुंबईत झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी हरवत भारताने पहिल्यांदाच आयसीसी ट्रॉफी जिंकली. या ऐतिहासिक विजयाची केंद्रबिंदू दीप्ती शर्मा ठरली.

युवराज सिंगनंतर वर्ल्ड कपमध्ये ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ ठरलेली ती दुसरी भारतीय ऑलराउंडर बनली आहे. दीप्तीने संपूर्ण स्पर्धेत 9 सामन्यांत 30.71 च्या सरासरीने 215 धावा केल्या, पण तिचा चेंडूवरही तितकाच प्रभाव होता. तिने सर्वाधिक 22 विकेट्स घेतल्या आणि प्रतिस्पर्ध्यांना अक्षरशः गुडघे टेकवायला लावलं. तिच्या अचूक बॉलिंग आणि संयमी फलंदाजीमुळे टीम इंडियाचा प्रत्येक सामना जिंकण्याचा आत्मविश्वास वाढत गेला.

या आधी भारतासाठी वर्ल्ड कपमध्ये ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ किताब जिंकणारे खेळाडू

सचिन तेंडुलकर (2003)
युवराज सिंग (2011)
विराट कोहली (२०२३)
आणि जसप्रीत बुमराह (2024
आता या यादीत नवीन नाव दीप्ती शर्मा.

अंतिम सामन्यात, भारताने प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेसाठी 299 धावांचे लक्ष्य ठेवले. भारताकडून शेफाली वर्माने सर्वाधिक 87 धावा केल्या, तर दीप्ती शर्माने 58 चेंडूत 58 धावा केल्या. प्रत्युत्तरात, दक्षिण आफ्रिकेचा संघ 246 धावांवर ऑलआउट झाला. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्डने या सामन्यात 101 धावांची शतकी खेळी केली, परंतु तिचा डाव संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

Comments are closed.