वकिलाची फी बुडवणे भोवले; ३५ हजार थकीत, फी वर ६ टक्के व्याज कल्याण दिवाणी न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
वकिलाची ठरलेली फी न देणे एका अशिलाला चांगलेच भोवले आहे. घटस्फोटाचा दावा लढवण्यासाठी ठरलेल्या ५० हजार रुपयांच्या फीपैकी केवळ १५ हजार रुपये देणाऱ्या अशिलाला आता उर्वरित ३५ हजार रुपये थकीत फीवर सहा टक्के व्याज द्यावे लागणार आहे. कल्याण दिवाणी न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे वकिलांची फी बुडवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
उमेश रमेश भोईर यांच्या घटस्फोटाच्या प्रकरणात वकील हरीश नायर यांनी त्यांचे वकीलपत्र स्वीकारले होते. यावेळी दोघांमध्ये ५० हजार रुपये फी निश्चित झाली होती. भोईर यांनी त्यापैकी केवळ १५ हजार रुपये दिले. उर्वरित ३५ हजार रुपयांसाठी नायर यांनी अनेकदा मागणी करूनही फी देण्यात आली नाही. अखेर नायर यांनी २०२२ मध्ये थकीत फीच्या वसुलीसाठी कल्याण दिवाणी न्यायालयात भोईर यांच्याविरोधात दावा दाखल केला. न्यायालयाने समन्स बजावूनही भोईर सुनावणीसाठी उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे प्रकरण एकतर्फी चालवण्यात आले. नायर यांनी तोंडी तसेच दस्तऐवजी पुरावे सादर करून आपला दावा सिद्ध केला.
कल्याणचे दिवाणी न्यायाधीश संतोष आगे यांनी भोईर यांना वकील हरीश नायर यांची ३५ हजार रुपयांची थकीत फी देण्याचे आदेश दिले. तसेच दावा दाखल केल्याच्या तारखेपासून रक्कम वसूल होईपर्यंत सहा टक्के व्याज देण्याचेही निर्देश दिले आहेत.
महिन्याच्या आत वकील हरीश नायर यांना द्यावी लागणार आहे. जोपर्यंत भाईर ही फीची रक्कम देत नाहीत तोपर्यंत या रकमेवर व्याज सुरूच राहणार आहे. न्यायाधीश संतोष आगे यांनी दिलेल्या आदेशानुसार भोईर यांना ही थकीत रक्कम एका निकाल ठरला कुतूहलाचा विषय नायर यांनी थकीत फीवर १८ टक्के व्याजाची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने सहा टक्के व्याज मंजूर केले. विशेष म्हणजे स्वतःची फी वसूल करण्यासाठी वकिलालाच न्यायालयाची दारे ठोठावावी लागली आहेत. असे खटले दुर्मिळातील दुर्मिळ असल्याने हा निकाल न्यायालयीन वर्तुळात चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरला आहे.
Comments are closed.