दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या पराभवानंतर सौरव गांगुली भडकले? गौतम गंभीरवर टीका करत केलं या खेळाडूचं समर्थन
कोलकाता कसोटीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (Test series IND vs SA) भारताला 124 धावांचं सोपं लक्ष्य गाठता आलं नाही. टीम इंडिया 30 धावांनी सामना हरली. भारतीय फलंदाजांनी फारच निराशाजनक खेळ केला. कोणताही फलंदाज शतक तर दूर, अर्धशतकदेखील करू शकला नाही. यानंतर माजी कर्णधार सौरव गांगुली (Saurav Ganguly) यांनी टीम इंडिया हेड कोच गौतम गंभीर (Head Coach Gautam Gambhir) यांच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
एनडीटीवीशी बोलताना सौरव गांगुली म्हणाले, चांगल्या विकेट्सवर खेळा. मला आशा आहे की गौतम गंभीर हे ऐकत असतील. मला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. ते खूप स्पर्धक वृत्तीचे आहेत. कोच म्हणूनही भारतासाठी त्यांनी चांगलं काम केलं आहे. पण त्यांना चांगल्या, योग्य पिचवर खेळायला हवं. त्यांच्या टीममध्ये बुमराह, सिराज, शमी, कुलदीप आणि जडेजा असे उत्कृष्ट खेळाडू आहेत.
गांगुलींनी मोहम्मद शमीला (Mohmmed Shami) प्लेइंग 11 मध्ये सामील करण्याची मागणी केली. ते पुढे म्हणाले, टीम इंडियाकडे जबरदस्त क्रिकेटर्स आहेत. सिराज, बुमराह आणि शमी हे तिघेही प्लेइंग 11 मध्ये असायलाच हवेत. गंभीरने बुमराह, सिराज आणि शमीवर विश्वास ठेवला पाहिजे. माझ्या मते शमी कसोटी टीममध्ये नक्कीच असायला हवा. शमी आणि स्पिनर्स तुमच्यासाठी कसोटी जिंकवून देतील.
शमीने भारतासाठी शेवटचा सामना चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात खेळला होता. त्यानंतर ते टीममध्ये दिसले नाहीत. आता ते पुनरागमनासाठी प्रयत्न करत आहेत. रणजी ट्रॉफी 2025–26 मध्ये बंगालकडून पहिल्या दोन सामन्यात त्याने तब्बल 15 विकेट घेतल्या. तरीही दक्षिण आफ्रिकेविरुद्धची 2 सामन्यांची कसोटी मालिका त्याला खेळायला मिळाली नाही.
Comments are closed.