भारतीय संघाला हरवायचंय? पाकिस्तानच्या माजी प्रशिक्षकाचा चकित करणारा फॉर्म्युला
मागील आठवड्यातील सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तान संघाला चांगलेच पराभूत केले. याशिवाय आयसीसी स्पर्धेमध्येदेखील भारताविरुद्ध पाकिस्तानच रेकॉर्ड खूप खराब आहे. आत्तापर्यंत वनडे फॉरमॅटमध्ये पाकिस्तान भारताला हरवू शकला नाही. तत्पूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताविरुद्ध पराभूत झाल्यानंतर पाकिस्तान संघावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
आता पाकिस्तान संघाचे माजी प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलिया संघातील वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पी यांनी भारताला हरवण्याचा कानमंत्र दिला आहे. ते म्हणाले की पाकिस्तान संघ भारताला कशा प्रकारे पराभूत करू शकतो? जेसन गिलेस्पी यांचं म्हणणं आहे की, जर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि काही निवडक प्रशिक्षकांना संघाने बदलले तर संघासाठी फायदा होऊ शकतो.
जेसन गिलेस्पी यांच्या म्हणण्यानुसार चॅम्पियन्स ट्रॉफीतील पाकिस्तानच्या पराभवाला संघ निवडकर्ते आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जबाबदार आहे. तसेच जेसन गिलेस्पी टाइम्स ऑफ इंडियाशी बातचीत करत होते. त्यादरम्यान जेसन गिलेस्पी यांनी सुनील गावसकर यांच्या म्हणण्याला वगळले, ज्यामध्ये ते म्हणाले होते की, भारतीय ब संघ पाकिस्तानला सहज हरवेल. पण जेसन गिलेस्पी यांना असे वाटते की, भारताला पाकिस्तान पराभूत करू शकतो. पण त्यासाठी आधी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड तसेच निवडकर्त्यांची योग्य निवड व्हायला हवी. त्याचसोबत संघ निवडण्याची जबाबदारी मॅनेजर आणि प्रशिक्षकांवर सोडण्यात यायला हवी.
जेसन गिलेस्पी पुढे म्हणाले की, पाकिस्तान संघाकडे कौशल्याची कमी नाही पण तुम्हाला संघासाठी चांगल्या खेळाडूंची निवड करावी लागेल. जेसन गिलेस्पी यांनी पाकिस्तानचे प्रशिक्षक राहिल्यामुळे संघासाठी त्यांचा अनुभव व्यक्त केला. तसेच ते म्हणाले जरी मी पाकिस्तानचा प्रशिक्षक असलो तरी सुद्धा मी फक्त सामना बघण्याशिवाय काही करू शकलो नाही.पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सगळी सूत्रे आकिब जावेद यांना सोपवली होती. यामुळे मी माझं पद सोडण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा
PSL आणि IPL मध्ये होणार टक्कर, PCB ने जाहीर केली स्पर्धेची तारीख!
शुबमन गिलला मिळणार मोठी जबाबदारी? रोहित शर्माचा पत्ता कट होणार?
पॅट कमिन्सनं भारतावर केला हा मोठा आरोप, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण, आफ्रिकन खेळाडूचीही साथ
Comments are closed.