DC vs KKR: दिल्लीनं जिंकला टाॅस, केकेआरला फलंदाजीचं आमंत्रण!
यंदाच्या आयपीएल हंगामातील 48वा सामना आज (29 एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स (DC vs KKR) संघात खेळला जाईल. यासाठी दोन्ही संघ दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर आमने-सामने आहेत. दरम्यान दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने टाॅस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11-
दिल्ली कॅपिटल्स- फाफ डु प्लेसिस, अभिषेक पोरेल (यशरक्षक), करुन नायर, केएल राहुल, अक्षर पटेल (कर्नाधर), ट्रिस्टन स्टॅब्स, विप्राज निगम, मिशेल स्टार्क, कुलदीप यादव, दुश्मण्था चामेरा,
कोलकाता नाईट रायडर्स- रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे(कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रोवमन पॉवेल, हर्षित राणा, अनुकुल रॉय, वरुण चक्रवर्ती
दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. त्यामध्ये अक्षरच्या नेतृत्वाखालील दिल्लीने 6 सामन्यात विजय मिळवला, तर 3 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीचा संघ गुणतालिकेत 12 गुणांसह चौथ्या स्थानी आहे.
दुसरीकडे, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील केकेआरची कामगिरी एवढी खास राहिली नाही. संघाने 10 सामन्यात केवळ 3 विजय मिळवले, तर 1 सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. केकेआरचा संघ गुणतालिकेत 7 गुणासंह सातव्या स्थानी आहे. दरम्यान आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार? हे पाहणे उत्सुकतेचं ठरेल. तसेच दिल्लीचा संघ आजचा सामना जिंकून प्लेऑफच्या दिशेने मजबूत पाऊल टाकण्याचा प्रयत्न करेल.
Comments are closed.