मुंबई इंडियन्स दिल्ली जिंकण्यासाठी सज्ज; पृथ्वी शॉला खेळवण्याची दिल्लीची चाल

तब्बल 13 वर्षांच्या सलामीहाराच्या पराभवांचा अपशकुनी सिलसिला मोडीत काढत आता विजयी आत्मविश्वासाने दिल्ली जिंकण्यासाठी मुंबई इंडियन्स सज्ज झाली आहे. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सनेही दमदार सलामी देत विजयाची लय पकडली असून घरच्या मैदानावर हीच लय कायम ठेवण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे दोन्ही संघांतील ही लढत रंगतदार होणार, यात शंका नाही.

पृथ्वी शॉची एण्ट्री?

दिल्लीच्या फलंदाजीतील अस्थिरता अजूनही डोकेदुखी ठरत आहे. लखनऊविरुद्धच्या सामन्यात वरच्या फळीने निराशा केली होती. मात्र समीर रिझवी आणि ट्रिस्टन स्टब्स यांच्या भागीदारीने संघाला सावरले. आता सलामीला स्थैर्य देण्यासाठी पृथ्वी शॉला संधी मिळण्याची जोरदार चर्चा आहे. लुंगी एनगिडी आणि टी. नटराजन यांच्या प्रभावी गोलंदाजीमुळे दिल्लीचा आघाडीचा विभाग मजबूत दिसतो. मधल्या षटकांत कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांची फिरकी जोडी प्रतिस्पर्ध्यांना अडचणीत टाकते.

मुंबईचा धडाका कायम

कोलकाताविरुद्धच्या विजयात रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन यांनी आक्रमक फलंदाजी करत संघाला जोरदार सुरुवात करून दिली. हार्दिक पंडय़ाच्या नेतृत्वाखालील संघ संतुलित दिसत असला तरी सूर्यकुमार यादवच्या फिटनेसकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गोलंदाजीत बदलांची शक्यता

मुंबईकडून शार्दुल ठाकूरने प्रभावी कामगिरी केली, तर जसप्रीत बुमरा आणि ट्रेंट बोल्ट यांनी अचूक मारा केला, मात्र इतर गोलंदाज अपेक्षेप्रमाणे चमकले नाहीत. त्यामुळे मिचेल सॅण्टनरला संधी मिळण्याची शक्यता आहे. एकूणच, पृथ्वी शॉला संधी मिळते का आणि सूर्यकुमार पूर्ण तंदुरुस्त आहे का, यावर या सामन्याचे चित्र ठरणार आहे.

कॉमन युनियन-

दिल्ली कॅपिटल्स – अभिषेक पोरेल, के. एल. राहुल, नितीश राणा, समीर रिझवी, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, आशुतोष शर्मा, दुष्मंथा चमीरा, कुलदीप यादव, मुकेश कुमार, विपराज निगम, मिचेल स्टार्क, त्रिपुरा विजय, डेव्हिड मिलर, औकिब नबी, पथुम निसांका, लुंगी जाम न्गिडी, प्रिथ जाम कुमारी, विपराज निगम. मंडल, टी नटराजन, माधव तिवारी, करुण नायर, साहिल पारख.

मुंबई इंडियन्स – हार्दिक पंड्या (पाठीमागणारा), क्विंटन डी कॉक, डॅनिश मलेवार, रॉबिन मिन्झ, रायन रिक्लेटन, शेरफेन रदरफोर्ड, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, अथर्व अंकोलेकर, राज बावा, कॉर्बिन बॉश, विल जॅक, मयंक रावत, नमन धीर, मिचेल शर्विन कुमार, अश्विन कुमार, अश्विन कुमार, अश्विन कुमार. ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, दीपक चहर, ए.एम. गझनफर, मयंक माकांडे, मोहम्मद इजहार, रघु शर्मा.

Comments are closed.