दिल्लीतील कालकाजी मंदिराच्या सेवेकऱ्याला मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू; किरकोळ वाद विकोपाला
दिल्ली क्राइम न्यूज नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील प्रसिद्ध कालकाजी मंदिरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या भांडणानंतर कालकाजी मंदिराच्या सेवादाराची हत्या (Delhi Crime News) करण्यात आलीय. त्यानंतर परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी गाठून पुढील चौकशी सुरु केली आहे.
संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना जिल्ह्याचे डीसीपी हेमंत तिवारी म्हणाले की, शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता कालकाजी पोलीस ठाण्यात मंदिर परिसरात हाणामारीची माहिती मिळाली. प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांचे पथक माहिती मिळताच तात्काळ कालकाजी मंदिरात पोहोचले.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पोलिसांनी सांगितले की, स्थानिक लोकांच्या चौकशीत असे उघड झाले की, काही लोक मंदिरात दर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या सेवादाराकडून प्रसाद मागितला. यादरम्यान, सेवादार आणि आरोपींमध्ये बाचाबाची झाली आणि प्रकरण इतके वाढले की आरोपींनी सेवादारावर काठ्या आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात कालकाजी मंदिरातील सेवेकरी गंभीर जखमी झाला. त्यांनतर या सेवादाराला ताबडतोब एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आलं. जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत सेवादाराचे नाव योगेंद्र सिंग, (वय 35 वर्षे, रहिवासी फत्तेपूर, हरदोई, उत्तर प्रदेश) असे आहे. तो गेल्या 14-15 वर्षांपासून कालकाजी मंदिरात सेवादार म्हणून काम करत होता आणि मंदिराशी संबंधित सेवांचे कामकाज पाहत होता.
पोलिसांनी केला गुन्हा दाखल
घटनेनंतर या संपूर्ण प्रकरणात कालकाजी पोघेतलेस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीसीपी हेमंत तिवारी यांच्या मते, घटनेदरम्यान स्थानिक लोकांनी एका आरोपीला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपीचे नाव अतुल पांडे (30 वर्षे) असे आहे, जो दक्षिणपुरीचा रहिवासी आहे. दिल्ली पोलिसांच्या अनेक पथकांनी आता इतर आरोपींची ओळख पटवली आहे आणि त्यांचा शोध सुरू केला आहे.पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. मंदिर परिसरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. त्याच वेळी, मृत सेवादाराच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे आणि शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.