IPL 2026 पूर्वी दिल्लीचे नेतृत्व नितीश राणाकडे! पहिल्यांदाच सांभाळणार इतकी मोठी जबाबदारी
नितीश राणा (Nitish Rana) आता दिल्ली संघाचा नवा कर्णधार बनला आहे. 26 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये (Sayyed Mushtak Ali trophy) नितीश प्रथमच दिल्लीचे नेतृत्व करताना दिसेल. दिल्लीला एलिट ग्रुप D मध्ये झारखंड, कर्नाटक, उत्तराखंड, राजस्थान, तमिळनाडू, सौराष्ट्र आणि त्रिपुरा या टीमसोबत ठेवण्यात आले आहे. दिल्लीचे सर्व सामने अहमदाबादमध्ये खेळले जाणार आहेत. दिल्लीने या स्पर्धेचे विजेतेपद आतापर्यंत फक्त एकदाच 2017-18 सीझनमध्ये प्रदीप सांगवान यांच्या नेतृत्वात जिंकले आहे.
नितीश राणा काही काळ उत्तर प्रदेशकडून खेळत होता, पण आता तो पुन्हा दिल्ली टीममध्ये परत येत आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये दिल्लीचे नेतृत्व करण्याचा हा त्याचा पहिलाच प्रसंग असेल. त्याने याआधी रणजी ट्रॉफीत दिल्लीचं नेतृत्व केलं आहे. मात्र 2025-26 रणजी सीझनच्या पहिल्या टप्प्यात तो एकही सामना खेळू शकले नव्हता.
तसेच, इंडियन प्रीमियर लीगमध्येही नितीश राणा दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील झाला आहे. दिल्लीने त्याला राजस्थान रॉयल्सकडून ट्रेडद्वारे आपल्या संघात घेतले आहे.
याआधी दिल्ली प्रीमियर लीग 2025 मध्ये त्याने वेस्ट दिल्ली लायन्स टीमचं कर्णधारपद भूषवलं आहे. केली आणि त्याच्या नेतृत्वात टीमने चॅम्पियनचा किताब जिंकला होता.
एक गोष्ट लक्षवेधी आहे की, स्पिनर दिग्वेश राठीला या वेळच्या दिल्ली स्क्वाडमधून वगळले आहे. DPL 2025 च्या क्वालिफायर सामन्यात राठी आणि नितीश राणा यांच्यात वाद झाला होता.
तसेच, ईशांत शर्मालाही स्क्वाडमध्ये स्थान मिळालेले नाही. तो खेळेल की नाही हे त्याच्या दुखापतीतून किती लवकर बरा होतो यावर अवलंबून असेल. आशिया कप राइजिंग स्टार्स स्पर्धेमधून इंडिया A बाद झाल्यामुळे सुयश शर्मा आणि प्रियांश आर्य (Suyash sharma & Priyansh Aarya) सुद्धा आता या स्पर्धेसाठी उपलब्ध झाले आहेत.
दिल्ली संघ : नितीश राणा (कर्ंधर), प्रियांश आर्य, सार्थक रंजन, आयुष बडोनी, अर्पित राणा, आयुष डोसेजा, मयंक रावत, तेजश्वी (यष्टीरक्षक), हिम्मत सिंग, यश धुल्ल, सिमरजीत सिंग, राहुल डागर, यश भाटिया, अंकित शर्मा, राजेश कुमार, प्रिन्स हरियाश शर्मा, यष्टिरक्षक, यशवंत शर्मा. ग्रेवाल, रोहन राणा, ध्रुव कौशिक, आर्यन राणा आणि वैभव कंदपाल.
Comments are closed.