Delhi hc refuses anticipatory bail to puja khedkar in upsc cheating case for fraud and misuse of obc disability quota
नवी दिल्ली : माजी आयएएस परीक्षार्थी पूजा खेडकर हिचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. यामुळे तिच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. तिच्यावर फसवणूक तसेच चुकीच्या पद्धतीने ओबीसी आणि दिव्यांग कोट्याचा लाभ घेतल्याचा आरोप आहे. (delhi hc refuses anticipatory bail to puja khedkar in upsc cheating case for fraud and misuse of obc disability quota)
पूजा खेडकर हिने तिच्या वागण्यामुळे देशाची प्रतिमा मलीन केली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) देखील तिला सिव्हिल सेवा परीक्षा – 2022 च्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे.
– Advertisement –
फसवणूक आणि चुकीच्या पद्धतीने ओबीसी आणि दिव्यांग कोट्याचा लाभ घेतल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेली माजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. पूजाने देशाची प्रतिमा मलीन केल्याची टिप्पणी न्या. चंद्र धारी सिंग यांच्या खंडपीठाने केली आहे.
हेही वाचा – Divorce case : मुलीकडच्या मंडळींनी सासरी तळ ठोकून बसणे क्रूरताच, कलकत्ता हायकोर्टचे निरीक्षण
– Advertisement –
जामीन अर्ज फेटाळतानाच न्यायालयाने यापूर्वी तिला दिलेली अंतरिम सुरक्षा देखील रद्द केली. ऑगस्टमध्ये पूजा खेडकरला अटकेपासून संरक्षण देण्यात आले होते. 31 जुलैला यूपीएससीने खेडकरची उमेदवारी रद्द केली होती. तसेच आयोगाने भविष्यातील सर्व परीक्षा आणि मुलाखतींसाठी तिला कायमस्वरूपी बंदी घातली आहे. सिव्हिल सेवा परीक्षा – 2022 च्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी यूपीएससीने तिला दोषी ठरवले आहे.
यापूर्वी पूजा खेडकरला सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता. तसेच तपास यंत्रणेला निष्पक्षपणे चौकशीचे आदेश दिले. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला पूजा खेडकरने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
हेही वाचा – Government scheme : सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ! काय आहे नेमका प्रकार?
पूजाच्या परिवाराने बोगस दस्तावेज घेण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत हातमिळवणी केली असावी, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.
यूपीएससी 2023 च्या बॅचची प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिने प्रशासकीय सेवा परीक्षा पास होण्यासाठी ओबीसी आणि दिव्यांग कोट्याचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी यूपीएससीने तिच्याविरोधात तक्रार दाखल केली. या चौकशीनंतर आयोगाने तिची निवड रद्द केली. तिला कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली. तसेच भविष्यातील सर्व परीक्षांना बसण्यास तिला मनाई करण्यात आली.
आयोगाच्या म्हणण्यानुसार, पूजा खेडकर हिने स्वतःचे नाव बदलून आपली ओळख लपवत परीक्षा नियमांचे उल्लंघन केले. एवढेच नाही तर तिने आपल्या आई – वडिलांसह आपला फोटो, सही, ईमेल, पत्ता, मोबाइल नंबर आणि पत्ता देखील बदलला.
Edited by : Ashwini A. Bhatavdekar
Comments are closed.