दिल्लीहून लंडनला जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड, इस्तंबूलमध्ये आपत्कालीन लँडिंग

दिल्लीहून लंडनला जाणाऱ्या वर्जिन अटलांटिक एअरलाइन्सच्या विमानात हवेतच तांत्रिक बिघाड झाला. यामुळे या विमानाचे इस्तंबूलमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानात 250 हून अधिक प्रवासी होते. वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला.

एका प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, हवेत असताना विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे समजले आणि आपत्कालीन लँडिंग करावे लागले. विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे समजताच क्रू मेंबर्स आणि प्रवाशांमध्ये घबराट पसरली, परंतु वैमानिकाने सतर्कता बाळगत परिस्थिती हाताळली.

इस्तंबूलमध्ये विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले आणि प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या घटनेचा सोशल मीडियावर निषेध नोंदवल्यानंतर वर्जिन अटलांटिक एअरलाइनने अधिकृत विधान आले. व्हर्जिन अटलांटिकने प्रवाशांना औपचारिक पत्र जारी करून याबाबत स्पष्टीकरण दिले. ‘किरकोळ तांत्रिक समस्येमुळे विमान इस्तंबूलला वळवण्यात आले. लंडनहून पर्यायी विमान पाठवण्यात आले आहे, जे इस्तंबूलहून रात्री 10.55 वाजता उड्डाण करेल आणि 00.15 वाजता लंडनला पोहोचेल. टर्मिनलमध्ये प्रवाशांसाठी नाश्ता आणि इतर सुविधांची व्यवस्था केली जात आहे’, असे एअरलाईनने म्हटले आहे.

Comments are closed.