दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात मोठा खुलासा; बॉम्ब बनवण्यासाठी पीठ दळण्याच्या मशीनचा वापर, कॅब ड्रा


दिल्ली लाल किल्ला स्फोट: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार ब्लास्ट प्रकरणाच्या तपासात मोठा धागा सापडला आहे. अटक आरोपी मुजम्मिल शकील गनईने स्फोटक तयार करण्यासाठी आटा चक्की आणि इलेक्ट्रिकल मशीनचा वापर केल्याचे समोर आले आहे. तपासादरम्यान हरियाणातील फरीदाबादमध्ये एका टॅक्सी ड्रायव्हरच्या घरातून ही आटा चक्की आणि मशीन जप्त करण्यात आली आहेत.

Delhi Red Fort Blast: फरीदाबादमधील भाड्याच्या खोलीत बनत होते स्फोटके

पुलवामा (जम्मू-काश्मीर) येथील रहिवासी गनई फरीदाबादमधील भाड्याच्या खोलीत आटा चक्कीच्या मदतीने युरिया बारीक दळत होता आणि नंतर इलेक्ट्रिकल मशीनच्या साहाय्याने त्याचे रिफायनिंग करून रासायनिक मिश्रण तयार करत होता. ९ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी याच ठिकाणावरून ३६० किलो अमोनियम नायट्रेट आणि अन्य स्फोटक सामग्री जप्त केली होती. चौकशीत गनईने कबूल केले की तो याच पद्धतीने युरियातून अमोनियम नायट्रेट वेगळे करून बराच काळ स्फोटक तयार करत होता. तो फरीदाबादमधील अल-फलाह विद्यापीठात डॉक्टर म्हणून कार्यरत होता.

Delhi Red Fort Blast: टॅक्सी ड्रायव्हरही ताब्यात; NIA चौकशी सुरू

ज्या टॅक्सी ड्रायव्हरच्या घरातून उपकरणे जप्त झाली, त्यालाही NIAच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. ड्रायव्हरने चौकशीत सांगितले की त्याची गनईशी ओळख सुमारे चार वर्षांपूर्वी झाली होती, जेव्हा तो आपल्या मुलाच्या उपचारासाठी अल-फलाह मेडिकल कॉलेजमध्ये आला होता.

Delhi Red Fort Blast: लाल किल्ल्याजवळील कार ब्लास्टमध्ये १५ ठार

लाल किल्ल्याजवळ हुंडई i20 कारमध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू झाला होता. कार चालवणारा आत्मघाती हल्लेखोर उमर उन नबी घटनास्थळी ठार झाला. तो काश्मीरचा रहिवासी आणि पेशाने डॉक्टर होता. उमरही अल-फलाह विद्यापीठाशी जोडलेला होता.

Delhi Red Fort Blast: ब्लास्टपूर्वीच काश्मीर पोलिसांनी उघड केला होता दहशतवादी मॉड्यूल

स्फोटाच्या काही तास आधीच जम्मू-काश्मीर पोलिसांनी पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद आणि अल-कायदा-संबंधीत अन्सार गझवत-उल-हिंदशी जोडलेल्या ‘व्हाइट कॉलर’ दहशतवादी मॉड्यूलचा भंडाफोड केला होता. या कारवाईत २,९०० किलो स्फोटक सामग्री जप्त झाली होती, ज्यात अमोनियम नायट्रेटही होते. हीच सामग्री दिल्ली ब्लास्टमध्ये वापरली गेल्याची शक्यता तपास यंत्रणा व्यक्त करत आहेत.

आणखी वाचा

Comments are closed.