दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांनी एका तरुणाला थप्पड मारली.

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीचे उपमुख्यमंत्री प्रवेश वर्मा यांनी एका तरुणाला कानशिलात लगावल्याचा प्रकार रविवारी उघड झाला. रस्ते बांधकामात भ्रष्टाचार झाल्यासंबंधीचा प्रश्न विचारल्याबद्दल मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. आम आदमी पार्टीने यासंबंधी रविवारी ‘एक्स’वर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये दिल्ली सरकारचे उपमुख्यमंत्री प्रवेश वर्मा एका तरुणाला कानशिलात लगावताना दिसत आहेत. काही लोक त्यांना रस्ते बांधकामातील भ्रष्टाचाराबद्दल प्रश्न विचारत होते. त्याचवेळी त्यांनी तिथे उभ्या असलेल्या एका तरुणाला कानशिलात लगावली. मात्र, त्यांच्या सुरक्षारक्षकांनी त्या तरुणाला तिथून हटवले, असा ‘आप’चा आरोप आहे. याप्रकरणी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रवेश वर्मा यांच्या अटकेची मागणी केली आहे. घटनेच्या अन्य ठिकाणच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये प्रवेश वर्मा आणि आमदार जरनैल सिंग यांच्यात बाचाबाची झाल्याचे दिसत आहे.

Comments are closed.