डिमॅट खाते हॅक करून कोटय़वधींची फसवणूक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

एका व्यक्तीचे डिमॅट खाते हॅक करून खात्यामधून कोटय़वधी रुपयांची फसवणूक करणाऱया तरुणाला दक्षिण सायबर आणखी एका तरुणाला अटक केली. या भामटय़ाने शेअर्स विक्री करून त्या बदल्यात एक कोटी 71 लाख 60 हजार रुपये किमतीचे पेनीज स्टॉप खरेदी केली होती.

डिमॅट खात्यावर डल्ला मारल्याचे त्यांच्या लक्षात येताच दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. याप्रकरणी वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक फातिमा बागवान, उपनिरीक्षक दीपेश शिंदे व पथकाने तपास सुरू केला. तेव्हा कांदिवलीच्या ठाकूर व्हिलेज परिसरात राहणाऱया पुष्पा बिंद (33) या महिलेने हे कांड केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पुष्पा हिला अटक करण्यात आली होती. त्यानंतर पथकाने शेअर ट्रेडिंग अॅडव्हायझरचे काम करणारा नितेश सिंह (30) यालादेखील अटक केली. तो मोतीलाल ओसवालमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत होता, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

Comments are closed.