धूर फवारणीने डेंग्यू, मलेरिया ‘ऑल आऊट’; कल्याण-डोंबिवलीत रुग्ण घटले

जंतुनाशक आजार घेतलेली काळजी, वेळोवेळी धुतलेले रस्ते.. डेंग्यू त्याबरोबरच फसफाईची चोख मोहीम मलेरिया यामुळे कल्याण-डोंबिवलीत यावर्षी डेंग्यू, लेप्टो मलेरियाच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे. चिकूनगुनिया फवारणी, डबकी जमा होऊ नये म्हणून या ‘ऑल आऊट’ मोहिमेने अन्य साथीच्या आजारांनीदेखील ‘काढता पाय’ घेतल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी डेंग्यू, मलेरिया, लेप्टो, चिकुनगुनियाचे तब्बल 764 रुग्ण आढळले होते. मात्र यंदा ही संख्या 545 वर आली आहे.
यंदा कल्याण-डोंबिवलीत साथरोग आजाराचे रुग्ण कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यू, मलेरिया रुग्णांची संख्या 50 टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. कल्याण-डोंबिवली पालिकेच्या साथरोग अधिकारी डॉ. प्रज्ञा टिके यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या तीन महिन्यात डेंग्यूचे 36, मलेरियाचे 121 रुग्ण आढळले. लेप्टो आणि चिकुनगुनियाचा एकही रुग्ण सापडला नाही, तर गेल्या अकरा महिन्यात डेंग्यू आणि मलेरियाचा प्रत्येकी एक रुग्ण दगावला.

ही काळजी घ्या !
घनकचरा आणि आरोग्य विभागाने वेळोवेळी पालिका क्षेत्रात जंतुनाशक फवारणी केली. रस्ते धुऊन काढले. डबकी साचणार नाहीत याची दक्षता घेतली. या सर्वांचा परिणाम म्हणून डासांची संख्या कमी झाली आणि साथरोगाला आळा बसला अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. दरम्यान, आपल्या घराजवळच्या इमारती किंवा चाळीत पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्या. कुठे डबकी तयार झाली असतील तर ती बुजवावी, कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावा. डास घरात येऊ नयेत म्हणून बंदोबस्त करा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

Comments are closed.