पावसाळा तोंडावर, नाले तुंबलेलेच; पालकमंत्र्यांनी दिली नवी डेडलाईन

पावसाळा तोंडावर आला असून मुंबईतील नालेसफाईचे काम अजूनही अपूर्ण आहे. मुंबईत अनेक नाले आजही तुंबलेले असून अतिवृष्टी झाल्यास मुंबईची पुरती वाट लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज उपमुख्यमंत्री-मुंबईचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नालेसफाईची पाहणी केल्यानंतर तत्काळ नवी डेडलाइन जाहीर केली. मुंबईच्या नालेसफाईला त्यांनी 7 जूनपर्यंत मुदतवाढ दिली असून नालेसफाईसाठी एआयबरोबरच रोबोटचाही वापर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिकेला दिले आहेत.
मुंबई महापालिकेने नालेसफाईला सुमारे दीड महिना उशिराने सुरुवात केली. मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मुंबईची नालेसफाई 31 मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्यानंतरही पंत्राटदारांकडून नालेसफाईच्या कामाला गती आली नाही. आधीच रखडलेल्या नालेसफाईत मान्सूनपूर्व पावसाने खोडा घातल्यामुळे आधीच कासवगतीने होणारी नालेसफाई पूर्णपणे कोलमडून गेली. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी आज भांडुप येथील उषानगर, उषानगर संपुल, नेहरूनगर नाला (वडाळा), धारावी टी जंक्शनजवळील नाल्यांची पाहणी केल्यानंतर नालेसफाईला 7 जूनची मुदतवाढ दिली.
पाणी उपशासाठी 422 पंप
नालेसफाईसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. रेल्वेच्या कल्व्हर्टखालील कचरा रोबोटच्या मदतीने स्वच्छ करण्यात येत आहे. पालिकेने दरवर्षी सखल भागात पाणी साचणारी ठिकाणे निश्चित केली असून 422 ठिकाणी उदंचन संच (पंप) लावले आहेत तर 2 ठिकाणी साठवण टाक्या आणि 10 ठिकाणी लघु उदंचन पेंद्र कार्यान्वित केली आहेत.
23 मे रोजीपर्यंतची नालेसफाई
झेड मुंबई शहर – 70.69 टाक
झेड पूर्व उपनगर – 88.31 टाक
झेड वेस्ट उपनगर – 90.27 टाक
झेड मिठी नदी – 51.03 टाक
झेड लहान नाले – 57.75 टाक
z एपूण नालेसफाई – 67.52 टक्के
Comments are closed.