ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या डिझायनरचे निधन

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे निर्माते, रशियन क्षेपणास्त्र रचनाकार अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे 5 एप्रिल रोजी वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले. लिओनोव्ह हे दिल्लीस्थित ब्रह्मोस एरोस्पेसची रशियन भागीदार असलेल्या ‘एनपोमाश’ या रशियन कंपनीचे सीईओ आणि मुख्य रचनाकार होते. लिओनोव्ह हे अवकाश प्रणाली आणि क्षेपणास्त्रांच्या रचनेसाठी, तसेच बॅस्टियन किनारी संरक्षण प्रणालीच्या रचनेसाठीही ओळखले जातात. लिओनोव्ह यांनी रशियन हायपरसॉनिक क्षेपणास्त्र झिरकॉनची रचनाही केली होती. झिरकॉन हे शत्रूच्या नौदल तळांवर हल्ला करण्यासाठी तयार केलेले एक हायपरसॉनिक क्षेपणास्त्र आहे, परंतु आता ते जमिनीवरील लक्ष्यांवरही मारा करण्यास सक्षम आहे. ते आपल्या अचूक मारा करण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जाते.

Comments are closed.