चांगली कामगिरी असूनही कर्णधारपद नाही? गावसकरांनी विचारला थेट प्रश्न
रजत पाटीदारच्या नेतृत्वामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघ आयपीएल 2025 मध्ये शानदार प्रदर्शन करत आहे. संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या खूप जवळ आहे. संघाला शनिवारी चेन्नई विरुद्ध सामना खेळायचा आहे. या सामन्याआधी माजी भारतीय क्रिकेटर सुनील गावस्कर यांनी म्हटले आहे की, आरसीबीचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या कर्णधार पदाचा हकदार आहे.
या स्टार अष्टपैलू खेळाडूने या हंगामात गोलंदाजीमध्ये शानदार प्रदर्शन करत 13 विकेट्स विकेट्स घेतल्या आहेत. तसेच फलंदाजी करत 97 धावा केल्या आहेत. आरसीबीने आयपीएल 2025 च्या आधी रजत पाटीदारला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला होता.
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गावस्कर म्हणाले, कर्णधार पदाची भूमिका कृणालसाठी चांगली राहील. खास करून ज्या प्रकारचे विचार त्याच्याकडे आहेत, त्यांनी सांगितले की, पंड्याने तीनही डिपार्टमेंटमध्ये फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये यशस्वी कामगिरी केली आहे. पण त्यानंतरही त्याला कर्णधार पदासाठी निवडले नाही.
गावस्कर म्हणाले, कृणाल पंड्या एक चांगला खेळाडू आहे. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण तो कायमच खेळामध्ये टिकून राहतो. पण तरी त्याला कोणी कर्णधार पदासाठी निवडत नाही. ज्या प्रकारे त्याची विचारशैली आहे, ते बघता कर्णधार पदासाठी तो अगदीच योग्य आहे.
लखनऊ सुपर जायंट्स संघात तीन हंगाम खेळल्यानंतर कृणालला आयपीएल 2025 च्या मेगा लिलावाआधी संघाने रिलीज केले. त्यानंतर आरसीबीने त्याला 5.75 करोड रुपयांना खरेदी केले. दिल्ली विरुद्ध त्याने नाबाद 73 धावांची खेळी केली. त्याशिवाय कृणालने या हंगामात गोलंदाजीमध्ये खूप प्रभावीपणे काम केले आहे. त्याने 10 सामन्यांमध्ये 13 विकेट्स घेतल्या आहेत.
Comments are closed.