10 हजार कोटींची संपत्ती असूनही सून गेली झोपडपट्टीत राहायला! तिने स्वतःच उघड केलं गुपित

दिव्या खोसला कुमारचा ‘एक चतुर नार’ हा चित्रपट येत्या १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. उमेश शुक्ला यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात नील नितीन मुकेश, सुनील शेट्टी आणि छाया कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटासाठी दिव्याला खूप मेहनत घ्यावी लागली आहे. चित्रपटातील भूमिकेसाठी ती लखनऊमधील एका झोपडपट्टीत राहत होती. दिव्या म्हणाली की, अडचणी असूनही झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आहे.

भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या यूट्यूब चॅनलवरील पॉडकास्टमध्ये दिव्याने झोपडपट्टीतील तिच्या अनुभवाबद्दल सांगितले. ती म्हणाली, ‘या चित्रपटात मी झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलेची भूमिका साकारत आहे. म्हणून मला प्रत्यक्षात झोपडपट्टीत राहावे लागले.

मी तिथे राहत होते. ते खूप कठीण होते. पुढे दिव्या म्हणाली, ‘मला वाटले की तिथले लोक जास्त आनंदी आणि समाधानी आहेत. ते निश्चिंत आहेत कारण त्यांना कोणत्याही अधिक इच्छा नसतात. ते मला चहासाठी आमंत्रित करायचे. मी हे सांगू नये पण तिथल्या स्त्रिया एकमेकांच्या केसांमधून उवा काढायच्या. माझ्या डोक्यातही उवा होत्या. तिथे खूप घाण होती. माझ्या झोपडीसमोर एक मोठा गटार होता. वासामुळे सुरुवातीचे काही दिवस खूप कठीण गेले. पण काही दिवसांनी मला त्याची सवय झाली.’ दिव्याच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती सत्यमेव जयते २, यारिया २ आणि सावी सारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे.

Comments are closed.