भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर हार्दिक पंड्याची पोस्ट, कोहली आणि सिराजची प्रतिक्रिया!

भारत-पाकिस्तानच्या वाढत्या वादामुळे आयपीएल स्पर्धा एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली आहे. यामध्ये टीम इंडियाचे खेळाडू भारतीय आर्मीला पाठिंबा देताना दिसत आहेत. भारतीय खेळाडू विराट कोहलीने 9 मे रोजी इंडियन आर्मीसाठी एक पोस्ट शेअर केली होती. तसेच वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने सुद्धा भारतीय सैन्यासाठी त्यांच्या धाडसाबद्दल कौतुक केले. आता भारतीय सैन्यासाठी हार्दिक पांड्याची सुद्धा एक पोस्ट वायरल होत आहे.

भारतीय क्रिकेट खेळाडू हार्दिक पांड्याने इंडियन आर्मीच्या सन्मानार्थ एक इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे. यामध्ये हार्दिकने लिहिले आहे की, आम्हाला भारतीय सैन्याच्या पराक्रमाबद्दल तसेच त्यांच्या बलिदानाबद्दल अतिशय अभिमान आहे. सर्व भारतीयांना सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही जे कार्य करत आहात त्यासाठी तुमचे खूप आभार. हार्दिक पांड्या सोबत पूर्ण भारत देश इंडियन आर्मीच्या सोबत आहे.

विराट कोहलीने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले होते की, या कठीण काळात आम्ही भारतीय आर्मी सोबत आहोत. आम्ही सर्व भारतीय सेनेला सलाम करतो. ते या कठीण काळात भारतीय देशाची रक्षा करत आहेत. तसेच तो हे देखील म्हणाला की, आम्ही आयुष्यभर या वीरांच्या शौर्यासाठी आणि पराक्रमासाठी त्यांचे उपकार कधीही फेडू शकणार नाही.

भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले होते की, ८ मे रोजीच्या रात्री भारतीय सैन्याने देशाच्या 15 शहरांची रक्षा केली होती. तसेच या पोस्टमध्ये त्याने इंडियन आर्मीला धन्यवाद म्हणत लिहिले होते की, केवळ इंडियन आर्मीमुळे संपूर्ण भारत सुखाने श्वास घेऊ शकत आहे.

Comments are closed.