निवडून येणार नाही कळल्यावर आम्ही काहीही जाहिरनामे काढतो, फडणवीसांची जाहीर कबुली

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘संवाद पुणेकरांशी’ या कार्यक्रमात अभिनेत्री गिरीजा ओक हिने मुलाखत घेतली. या मुलाखतीत फडणवीस ”आम्ही राजकारणी लोकं निवडून येणार नाही कळल्यावर काहीही जाहिरनामे काढतो, अशी जाहीर कबुली दिली आहे. यावेळी बोलताना फडणवीस यांनी ”निवडून येणार नाही कळल्यावर आम्हीही काहीही जाहिरनामे काढतो”, अशी जाहीर कबुली दिली. त्यावरून लोकांनी पोटातलं ओठावर आलं अशी प्रतिक्रीया दिली आहे.
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेट्रोचा प्रवास सर्वांना मोफत करायला हवा असं वक्तव्य केलं होतं. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, ”आज मी जाहीर करणार होतो की पुण्यातून उडणाऱ्या सर्व विमानांची तिकीटं महिलांसाठी मोफत करायला हवी. जाहीर करायला आपल्या बापाचं काय जातं? आम्ही राजकीय क्षेत्रातील लोकं, निवडणूक जिंकण्याच्या हव्यासापोटी जेव्हा आम्हाला माहित असतं की आम्ही जिंकून येऊ शकत नाही तेव्हा आम्ही काहीही जाहीरनामे काढतो, त्या जाहीरनाम्यात काहीही म्हणतो. तरी मला वाटतं की लोकांचा विश्वास बसेल अशा तरी गोष्टी म्हटल्या पाहिजे”, असे फडणवीस यावेळी म्हणाले.

Comments are closed.