Devendra Fadnavis asked the opposition if they oppose Hindi then why not English?
हिंदी सक्तीच्या राज्य सरकारच्या निर्णयावर विरोधक टीका करताना दिसत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही, अशा इशारा दिला आहे. यासंदर्भात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदीला विरोध मग इंग्रजीला का नाही? असा सवाल विचारला आहे.
मुंबई : तमिळनाडू सरकारने केंद्राच्या त्रिभाषा सूत्राला जोरदार विरोध दर्शवला असताना राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने राष्ट्रीय शिक्षण धोरणाची यंदाच्या चालू शैक्षणिक वर्षात म्हणजे 2025-26 पासूनच अंमलबजावणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर विरोधक टीका करताना दिसत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही, अशा इशारा दिला आहे. यासंदर्भात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदीला विरोध मग इंग्रजीला का नाही? असा सवाल विचारला आहे. (Devendra Fadnavis asked the opposition if they oppose Hindi then why not English?)
देवेंद्र फडणवीस यांना सध्या हिंदी सक्तीला होणाऱ्या विरोधाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य आहे आणि सर्वांनी ती शिकलीच पाहिजे. पण त्याच्यासोबत दुसरी एखादी भाषा शिकायची असेल तर ती भाषा देखील महाराष्ट्रात शिकता येते. पण मला विरोधकांचं आश्चर्य वाटतं की, ते आता हिंदीला विरोध करत आहेत, मग एवढे दिवस इंग्रजीला विरोध का नाही केला? इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध हा विरोधकांचा कोणता विचार आहे? असे प्रश्न उपस्थित करत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आता हिंदीला विरोध होत असला, तरी जर कोणी मराठीला विरोध केला तर सहन केला जाणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
हेही वाचा – Raj Thackeray : माझा इगो नाही, एकत्र येणंही कठीण नाही पण विषय इच्छेचा; राज ठाकरेंकडून टाळीसाठी हात पुढे
काय म्हणाले होते राज ठाकरे?
राज ठाकरे यांनी म्हटले होते की, हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे. ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची? केंद्र सरकारचं सध्या जे सर्वत्र ‘हिंदीकरण’ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारांपुरतंच मर्यादित ठेवा, त्याला शिक्षणापर्यंत आणू नका. आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही! त्यामुळे महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे. या सगळ्याकडे पाहिलं तर लक्षात येतं की सरकार हा संघर्ष मुद्दामून घडवत आहे. कारण येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये मराठी विरुद्द मराठेतर असा संघर्ष घडवून स्वतःचा फायदा काढून घेण्यासाठी हा सगळा अट्टाहास सुरू आहे का? असा प्रश्न देखील राज ठाकरे यांनी विचारला. मात्र राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर आदित्य ठाकरे यांनी संशय व्यक्त केला आहे.
Comments are closed.