Devendra Fadnavis’ daughter Divija passes 10th exam with 92.60 percent marks


काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशन (CISCE) आज ICSE (इयत्ता 10 वी) आणि ISC (इयत्ता 12 वी) चा निकाल जाहीर केला आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लेक दहावी परीक्षेत घवघवीत यश घेऊन पास झाली आहे.

मुंबई : काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशन (CISCE) आज ICSE (इयत्ता 10 वी) आणि ISC (इयत्ता 12 वी) चा निकाल जाहीर केला आहे. दहावी आणि बारावी परीक्षेला बसलेले विद्यार्थी आपले टक्केवारी अधिकृत वेबसाइट्स – cisce.org आणि results.cisce.org वर पाहू शकतात. महत्त्वाचे म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लेक दहावी परीक्षेत घवघवीत यश घेऊन पास झाली आहे. (Devendra Fadnavis’ daughter Divija passes 10th exam with 92.60 percent marks)

यावर्षी आयसीएसई दहावीच्या बोर्ड परीक्षा 18 फेब्रुवारी ते 27 मार्च दरम्यान घेण्यात आल्या होत्या. गेल्या वर्षी सीआयएससीई दहावीचा निकाल 99.47 टक्के इतका लागला होता. मात्र यंदाच्या वर्षी मुली 99.65 टक्के आणि मुलं 99.31 टक्क्यांनी उर्तीर्ण झाली आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लेक दिविजा ही सुद्धा पास झाली आहे. यासंदर्भात अमृता फडणवीस यांनी माहिती दिली आहे.

हेही वाचा –  Sharad Pawar : यासंबंधी भाष्य करण्याचा…; ठाकरे बंधू एकत्र येण्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया

अमृता फडणवीस यांनी ट्वीट करताना म्हटले की, सर्वांना अक्षय्य तृतीयेनिमित्त हार्दिक शुभेच्छा. आजच्या शुभमुहूर्तावर “वर्षा” या निवासस्थानी आम्ही छोटीशी पूजा संपन्न करीत गृहप्रवेश केला. आजच्या दिवशीची आणखी एक अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सर्वांना सांगताना मन आनंदाने भरून आलं आहे. आमची सुकन्या दिविजा ही 10वी बोर्डाच्या परीक्षेत 92.60 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे, अशी माहिती अमृता फडणवीस यांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा वर्षा बंगल्यावर गृहप्रवेश

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधत वर्षा बंगल्यावर आज (30 एप्रिल) गृहप्रवेश केला आहे. दिवीजा हिची 10 वी परीक्षा असल्याने देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यावर आपल्या जुन्याच घरी म्हणजे सागर बंगल्यावर राहत होते. यासंदर्भात माहिती देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, मुलीची परीक्षा असल्याने मी वर्षा बंगल्यावर राहायला गेलो नाही. तसेच त्या ठिकाणी थोडं डागडुचीचं कामही बाकी आहे. त्यामुळे मुलीची परीक्षा संपल्यानंतर मी वर्षा बंगल्यावर राहायला जाणार आहे. याचपार्श्वभूमीवर आज देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर गृहप्रवेश केला आहे.

हेही वाचा – Raut Vs Mahayuti : …तर, भ्रष्टाचाराला फडणवीसांचे अभय असे मानू, विखे पाटील प्रकरणावरून राऊतांचा निशाणा





Source link

Comments are closed.